शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दोन आरोपींना ४ आॅक्टोबर पर्यंत पीसीआर

By admin | Updated: October 2, 2016 02:57 IST

गोकुळपेठ बाजारात २९ सप्टेंबर रोजी दिवसाढवळ्या १.५० वाजताच्या सुमारास झालेल्या सचिन सोमकुवर याच्या खूनप्रकरणी अंबाझरी

न्यायालय : गोकुळपेठ बाजारातील खून नागपूर : गोकुळपेठ बाजारात २९ सप्टेंबर रोजी दिवसाढवळ्या १.५० वाजताच्या सुमारास झालेल्या सचिन सोमकुवर याच्या खूनप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना शनिवारी मुख्य न्यायदंडाधिकारी डी. पी. रागीट यांच्या न्यायालयात हजर करून आरोपींचा ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आला. मोहम्मद अशफाक ऊर्फ बिट्टू अहमद जुबेर अन्सारी (३२)रा. कामठी रोड आम्रपाली अपार्टमेंट आणि अंकित राजकुमार पाली (२५) रा. सुदामनगरी, अशी आरोपींची नावे आहेत. पांढराबोडी मुंजेबाबा आश्रम ले-आऊट येथील रहिवासी सचिन प्रकाश सोमकुवर आणि त्याचा मित्र सूरज अशोक डोंगरे यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार करून सचिनचा घटनास्थळीच खून केला होता तर सूरजला गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी पोलिसांनी बिट्टू आणि अंकित पाली या दोघांना अटक केली होती. त्यांचा तिसरा साथीदार राजेश परतेकी हा मात्र फरार आहे. सहायक पोलीस निरीक्षक सूरज एस.सुरोशे यांनी बिट्टू आणि पाली यांना न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ए. पी. सिंग यांनी आरोपींचा सात दिवसांचा पोलीस कोठडी मिळावा, अशी विनंती करताना न्यायालयाला सांगितले की, घडलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून मुख्य आरोपी राजेश परतेकी हा फरार आहे. त्याचा ठावठिकाणा या दोन आरोपींना माहीत आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आणि इन्डोव्हर नावाची मोटार जप्त करणे आहे. आरोपींचे वकील अ‍ॅड. ओमप्रकाश मासुरके आणि अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगावकर यांनी आरोपींचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचे सांगून कमीत कमी पोलीस कोठडी रिमांड देण्यात यावा, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून दोन्ही आरोपींना ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)