शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विसोरा परिसरातील तलाव तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:27 IST

देसाईगंज तालुक्यातील विसोरा, शंकरपूर, कसारी, डोंगरमेंढा भागात सोमवार व मंगळवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील तलाव, बोड्या तुडूंब भरल्या आहेत. त्याआधी १५-२० दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने संकटात आलेल्या धानपीकाला नवसंजीवनी दिली आहे.

ठळक मुद्देमुसळधार पावसाचा परिणाम : अंतिम टप्प्यात पिकांना होणार उपयोग

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : देसाईगंज तालुक्यातील विसोरा, शंकरपूर, कसारी, डोंगरमेंढा भागात सोमवार व मंगळवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील तलाव, बोड्या तुडूंब भरल्या आहेत. त्याआधी १५-२० दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने संकटात आलेल्या धानपीकाला नवसंजीवनी दिली आहे.विसोरा, शंकरपूर, कसारी गावांसह परिसरात आलेल्या पावसाच्या दमदार सरींनी धानाला चांगलीच उभारी मिळाली आहे. एकाएकी डोळ्यांना न दिसणारा, खूपच बारीक रेषेसमान असा जोर नसलेला, जमीन सुद्धा ओली न करणारा पाऊस गेल्या आठवड्याभरापूर्वी सुरू होता.जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून गेलेला पाऊस काल-परवापर्यंत जोर धरून पडत नव्हता. त्यामुळे धानपिकाचे काय होणार? या विचारात शेतकरी गुंतून गेला होता. रोवणी होऊन आता महिनाभराचा कालावधी झालेला असल्याने वर्तमान स्थितीत जोरदार पावसाची गरज होती. हवा तसा जोरदार पाऊस पडल्याने धानाच्या वाढीवर अनुकूल प्रभाव पडणार हे निश्चित. तरी बहुतेक काही क्षेत्रातील धानपिकाला अळी लागली आहे. त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर पडणार अशी माहिती आहे.जुलैच्या २० तारखेला गाढव वाहनावरील पुष्य नक्षत्रात आलेला पाऊस गाढवासमान आळशी होऊन चक्क गायब झाला आणि २ आॅगस्टला संपला. आॅगस्ट ३ तारखेला घोड्यावर बसून आलेला आश्लेषा नक्षत्र घोड्याच्या धावेसारखा सुसाट येणार अशी आशा असतांना अखेर संपण्याच्या एक दिवसापूर्वी मुसळधार कोसळला. १६ आॅगस्टला आश्लेषा नक्षत्र संपला.१७ आॅगस्टपासून उंदीर वाहनाचा मेघा नक्षत्र सुरू झाला आहे. महिनाभरापूर्वी रजेवर गेलेल्या पावसाने परिसरातील जलसाठे शंभर टक्के भरणार की नाही याबाबत शंका निर्माण केली होती. परंतु २० आॅगस्टला पाऊस दमदार बरसल्याने विसोरा, शंकरपूर, कसारी येथील तलाव, बोड्या, नाले, रस्त्याकडेला असलेले खड्डे यांमध्ये पाणीच पाणी भरले आहे. पुन्हा १५ दिवसांनंतर पावसाची गरज भासणार आहे. 

टॅग्स :Rainपाऊस