शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
4
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
5
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
6
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
7
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
9
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
10
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
11
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
13
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
14
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
15
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
16
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
17
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
18
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
19
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
20
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

एनपीएस बंद करून जुनी पेन्शन द्या, कर्मचारी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 05:00 IST

मागील १६ वर्षांच्या कालावधीत राज्यभरातील सुमारे १ हजार ६०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबाला डीसीपीएस व एनपीएस याेजनेंतर्गत काेणताही लाभ देण्यात आला नाही. मृतकाचे कुटुंब निवृत्ती वेतन,  ग्रॅज्र्युईटी आदी लाभापासून वंचित आहेत. इतरही काही अनुषंगिक लाभ अद्याप दिले गेलेले नाहीत.  एनपीएस पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी हक्काची पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : महाराष्ट्र शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक १ नोव्हेंबर २००५ पासून परिभाषित अंशदान पेन्शन योजना (डीसीपीएस) लागू केली. सन २०१५ पासून या योजनेचे रूपांतर राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) झाले. ही याेजना कर्मचाऱ्यांसाठी मारक असून ती बंद करून पूर्वी प्रमाणेच जुनी पेन्शन याेजना लागू करावी, या मागणीसाठी जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयासमाेर ठिय्या आंदाेलन केले. मागील १६ वर्षांच्या कालावधीत राज्यभरातील सुमारे १ हजार ६०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबाला डीसीपीएस व एनपीएस याेजनेंतर्गत काेणताही लाभ देण्यात आला नाही. मृतकाचे कुटुंब निवृत्ती वेतन,  ग्रॅज्र्युईटी आदी लाभापासून वंचित आहेत. इतरही काही अनुषंगिक लाभ अद्याप दिले गेलेले नाहीत.  एनपीएस पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी हक्काची पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरचे आंदाेलन अखिल भारतिय राज्य कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांचे नेतृत्वात करण्यात आले. यावेळी जिल्हा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहनकर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील चडगुलवार, सरचिटणीस भास्कर मेश्राम, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, सरचिटणीस दामोधर पटले, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, श्रीकृष्ण मंगर, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेचे सचिव फिरोज लांजेवार, कोषाध्यक्ष अखिल श्रीरामवार, नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष निलू वानखेडे, आशा कोकोडे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लतिफ पठाण, सचिव किशोर सोनटक्के, जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन ठाकरे, सचिव राजू रेचनकर, जि.प.महिला कर्मचारी समितीचे अध्यक्ष कविता साळवे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरुदेव नवघडे, सरचिटणीस बापू मुनघाटे,पांडुरंग पेशने आदी उपस्थित हाेते. 

या आहेत प्रमुख मागण्या

अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याची शिफारस विधिमंडळाच्या ठरावासह केंद्र शासनाला सादर केली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनानेसुद्धा अशा शिफारशीसह प्रस्ताव केंद्र शासनाकडे तत्काळ सादर करावा.एनपीएसधारक कर्मचाऱ्यांना सद्य:स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुज्ञेय असलेले लाभ द्यावेत.शासनाकडून मिळणाऱ्या १४ टक्के अंशदान रकमेची वजावट आयकरासाठी एकूण वार्षिक उत्पन्नातून अनुज्ञेय करावी.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी निवड झाल्या, परंतु उशिराने नियुक्ती आदेश मिळालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 

चामोर्शी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलनजुनी पेन्शन याेजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी चामार्शी तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी चामोर्शी तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले. आंदाेलनात मंडळ अधिकारी तारेश फुलझेले, के. पी. शेरकी, डी. के. वाडके, किशोर येरगुडे, एस. पी. शेख, बी. झेड झुरे, वंदना पेशट्टीवार,. गौरव भांडेकर, विराज वासेकर, विलास निरगुळे, पुरण कुमरे, गणेश कुंभारे, विवेक नैताम, एस. ए. ठाकूर, निमेश तोडसाम, महेश मडावी, नागेश्वर रांपजी, रोहित भादेकर, व्ही. आर. वगरकर,  देवांगणा सहारे, लीना मेश्राम, महादेव झाडे, अमोल गेडाम, सावण कुळसंगे, कुणाल वानखेडे, अमोल मंगर, आनंद वाढई, चव्हाण, सुनील दुधबावरे, एम. ए. कोठारे, योगिता मडावी आदी उपस्थित हाेते.

 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन