शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शेळी व कुक्कुटपालनाकडे वळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 22:44 IST

दुर्गम गावातील नागरिकांना शेतीसह जोडधंदा करता यावा, या हेतूने सीआरपीएफ ९ बटालियनच्या वतीने सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमाअंतर्गत शेळ्या व कोंबड्यांचे वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देदुर्गम गावांमध्ये शेळी व कोंबड्यांचे वितरण : सीआरपीएफ ९ बटालियनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : दुर्गम गावातील नागरिकांना शेतीसह जोडधंदा करता यावा, या हेतूने सीआरपीएफ ९ बटालियनच्या वतीने सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमाअंतर्गत शेळ्या व कोंबड्यांचे वितरण करण्यात आले.सीआरपीएफ ९ बटालियनचे कमांडंट रवींद्र भगत यांच्या मार्गदर्शनात राजाराम, सूर्यापल्ली, पत्तीगाव, नीमलगुडम आदी गावांमध्ये चार शेळ्या व एक बोकड अशा एकूण ३० नगांचे वितरण सहा कुटुंबांना करण्यात आले. तसेच राजाराम, डुुडेपल्ली, बुर्गी, रेपनपल्ली, पेरमिली येथे एकूण २५ शेळी व बोकडांचे वितरण करण्यात आले. कुकुटपालनाकरिता एका कुटुंबाला आठ कोंबड्या व दोन कोंबडे यासह एक खुराडे तसेच १० किलो खाद्याचे बुर्गी, उडेरा, करपनकुंडी, कांदोळी, मिरकल येथे २० परिवारांना वितरण करण्यात आले. राजाराम, पेरमिली, ताडगाव, रेपनपल्ली व अहेरी आदी गावांमध्ये १० परिवारांना प्रत्येकी आठ कोंबड्या, दोन कोंबडे व एक खुराडे, १० किलो खाद्य वितरित करण्यात आले. या गावांमध्ये एकूण १६० कोंबड्या, ४० कोंबडे वितरित करण्यात आले. आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता तसेच सामाजिक कल्याण व सद्भावना कायम राखण्याच्या हेतूने सीआरपीएफ ९ बटालियनच्या वतीने आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शेतीसह जोडधंदा करण्याकरिता शेळ्या व कोंबड्यांचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाला कमांडंट रवींद्र भगत, सीएमओ एन.के. प्रसाद, उपकमांडंट राकेश कुमार, बी.सी. रॉय, सहायक कमांडंट राजकुमार, सहायक कमांडंट विकास कुमार तसेच राजाराम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी धनंजय वेठेकर, रायगड्डाच्या सरपंच शकुंतला कुळमेथे, राजाराम प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राजेश मानकर, मुख्याध्यापक सुनील अंजेवार व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.