शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करणार

By admin | Updated: March 14, 2016 01:22 IST

गडचिरोली जिल्ह्यात रिक्त पदांचा अनुशेष साडेतीन हजाराच्या वर असून यात आरोग्य विभागाची सर्वात जास्त पदे रिक्त आहेत.

अशोक नेते यांचे आश्वासन : आरमोरीत वैद्यकीय व दंत शिबिराचे उद्घाटनआरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात रिक्त पदांचा अनुशेष साडेतीन हजाराच्या वर असून यात आरोग्य विभागाची सर्वात जास्त पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहोचण्यास अडचण जात आहे. आरोग्य विभागातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी आपला शासनाकडे पाठपुरावा सुरू असून या संदर्भात पुन्हा आपण प्रयत्न करणार असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत येथील उपजिल्हा रूग्णालयात रविवारी वैद्यकीय व दंत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार क्रिष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य लक्ष्मी मने, पुन्नम गुरनुले, पं.स. सभापती सविता भोयर, रवींद्र बावणथडे, नंदू पेटेवार, रामभाऊ पडोळे, सदानंद कुथे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेजा मैदमवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद गवई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश मोटे, डॉ. वानखेडे, डॉ. नागदेवते, डॉ. मनीषा गेडाम, पंकज खरवडे, सुनील नंदनवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. प्रमोद गवई, संचालन डॉ. अर्पणा टेंभरे यांनी केले. (वार्ताहर)१०० खाटांचे रूग्णालय होण्यासाठी पाठपुरावाआरमोरी रूग्णालयात अपुऱ्या खाटांच्या व्यवस्थेमुळे रूग्णांची गैरसोय होते. रूग्णांना परिपूर्ण सेवासुविधा मिळण्यासाठी या रूग्णालयाला १०० खाटांचे रूग्णालय करण्यासाठी आपण आरोग्यमंत्र्याची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या रूग्णालयात ट्रामा सेंटरची मंजुरी आवश्यक आहे. त्याकरिता आपला शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, अशी ग्वाही आमदार क्रिष्णा गजबे यांनी अध्यक्षीय भाषणात दिली.