शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वैज्ञानिक प्रक्रियेनेच सत्य गवसते

By admin | Updated: November 22, 2014 01:16 IST

एखाद्या गोष्टीचा मनावरील प्रभाव हा त्या गोष्टीवर विश्वास दृढ करतो. वास्तविक नसलेल्या ज्या गोष्टींवर व्यक्तीचा जेव्हा विश्वास दृढ होतो तेव्हा ...

गडचिरोली : एखाद्या गोष्टीचा मनावरील प्रभाव हा त्या गोष्टीवर विश्वास दृढ करतो. वास्तविक नसलेल्या ज्या गोष्टींवर व्यक्तीचा जेव्हा विश्वास दृढ होतो तेव्हा अंधश्रद्धा अंगी बाणवते व व्यक्तीची वृत्ती अंधश्रद्धाळू होते. त्यामुळे अंधश्रद्धेला बळी न पडता वैज्ञानिक व चिकित्सक दृष्टी ठेवल्यास सत्य गवसते, असे प्रतिपादन जादूटोणा विरोधी जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी केले. स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित ‘जादूटोणा विरोधी कायदा समजून घ्या’ या व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. भारतात ढोंगीबाबांचे चमत्कार आणि अंधश्रध्देचे भूत मानवी मनात खोलवर रूजविल्या गेले आहे. परंतु एखादा बाबा हवेत हात फिरवून कुठलीही वस्तू कशी आणतात, मंत्रोच्चाराने अग्नी कसा प्रज्वलित होतो, इतकेच नव्हे तर अंगात शिरलेले भूत कसे केले जाते. यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई झाली पाहिजे, असे सांगून माणवी जीवन जगताना व्यक्तींनी चमत्कारांकडे न वळता वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा, असे आवाहन अखील भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी केले.कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त आर. डी. आत्राम, प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जि. प. समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, सुरेश झुरमुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे, संचालन जिल्हा संघटक प्रा. जगदिश बद्रे यांनी केले.