कुरखेड्याला प्रकल्प कार्यालय द्या : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादरगडचिरोली : आदिवासी विद्यार्थी संघातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांकरिता निघालेल्या या मोर्चात जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मोर्चाचा प्रारंभ इंदिरा गांधी चौक येथून करण्यात आला. हा मोर्चा चंद्रपूर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे आदिवासी विद्यार्थी संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रणजितकुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी विद्यार्थी संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करण्यात आले. मोर्चात आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थी सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व आदिवासी विद्यार्थी संघाचे प्रा. दौलत धुर्वे, संदीप वरखडे, मुकेश नरोटे, प्रकाश मट्टामी, अनिल केरामी, रविता नैताम, संजय गावडे, प्रवीण हलामी, भास्कर आतला, चक्रपाणी मडावी, मुकेश नरोटे, रसिका दुग्गा, पल्लवी मडावी, दिशा पोरेटी यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
आदिवासी विद्यार्थ्यांची धडक
By admin | Updated: January 20, 2015 22:34 IST