शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पडियालजोबवासीयांनी केली सामूहिक तेरवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:29 IST

तालुक्यातील मसेली भागातील पडियालजोब गावात ग्रामस्थांच्या पुढाकाराने पूर्वजांच्या तेरवीचा सामूहिक कार्यक्रम दि.१७ व १८ मार्चला घेण्यात आला. दरम्यान यावेळी आदिवासी परंपरेनुसार सर्व विधी पार पाडण्यात आले.

ठळक मुद्देपैसे व वेळेची बचत : आदिवासी परंपरेनुसार पार पाडला विधी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील मसेली भागातील पडियालजोब गावात ग्रामस्थांच्या पुढाकाराने पूर्वजांच्या तेरवीचा सामूहिक कार्यक्रम दि.१७ व १८ मार्चला घेण्यात आला. दरम्यान यावेळी आदिवासी परंपरेनुसार सर्व विधी पार पाडण्यात आले.पडियालजोब गावाने ग्रामसभेत याबाबतचा निर्णय घेतला होता. गेल्या अनेक वर्षांपासून गावातील मृत्यू पावलेले आई-वडील व इतर पूर्वजांच्या तेरवीच्या कार्यक्रमासाठी अनेक दिवस लागतात. १२ परिवारातील तेरवीचा कार्यक्रम घ्यावयाचा होता.एका परिवाराला कार्यक्रम म्हटला की, आदिवासी गोंडी परंपरेनुसार तीन दिवस लागतात. १२ परिवाराचे मिळून एकूण ३६ दिवस हा कार्यक्रम चालला असता. यात संबंधित कुटुंबीयांसह गावातील नागरिकांचा वेळ खर्च झाला असता, शिवाय आर्थिक झळही पोहोचली असती.प्रत्येक कुटुंबाला हा खर्च करणे शक्य झाले नसते. त्यामुळे सर्व १२ परिवारातील पूर्वजांच्या तेरवीचा सामुहिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्वांचा मिळून एकूण खर्चाचा अंदाजीत आराखडा तयार करण्यात आला. पडियालजोगवासीयांनी या कार्यक्रमासाठी लागणारे धान्य गोळा केले.तसेच काही रकमेची जुळवाजुळव केली. सदर कार्यक्रमाच्या कामाची जबाबदारी प्रत्येकाला निश्चित करून देण्यात आली. १७ मार्च रोजी आदिवासी परंपरेनुसार नृत्याच्या कार्यक्रम पार पडला. त्यानंतर १८ मार्चला गावात असलेल्या २० समाधीची स्वच्छता व रंगरंगोटीचे काम एका दिवसात करण्यात आले. त्यानंतर पारंपारिक पध्दतीने तेरवीचा सर्व विधी पार पाडण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमाला बाराही कुटुंबातील सगे, सोयरे, आप्तेष्ट व भुमक यांची लांबच्या लांब रांग लागली होती.कोरची तालुक्यात सामुहिक पध्दतीने अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच पार पाडल्याने बाहेरगाववरून पाहुणे मंडळीची येथे गर्दी झाली होती. सायंकाळी ग्रामसभेमार्फत सामुहिक भोजनाचा कार्यक्रम पार पडला. सामुहिक कार्यक्रम घेतल्यामुळे पाहुण्याच्याही वेळ व पैशाची बचत झाली.