शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्लीत आदिवासींचे उपोषण

By admin | Updated: October 27, 2015 01:38 IST

जनहितवादी युवा समिती व अहेरी जिल्हा कृती समिती एटापल्ली यांच्या नेतृत्वात एटापल्ली तालुक्यातील आदिवासी

एटापल्ली : जनहितवादी युवा समिती व अहेरी जिल्हा कृती समिती एटापल्ली यांच्या नेतृत्वात एटापल्ली तालुक्यातील आदिवासी महिलांनी विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे. ग्रामसभेचे ठराव व इतर आवश्यक कृत्यांची पूर्तता करूनही प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे २००८ पासूनचे वनहक्क मंजूर करण्यात आले नाही. तिन्ही समित्यांमधील अधिकारी यांच्यात समन्वय घडवून आणणे आवश्यक आहे. यासाठी जनहितवादी युवा समितीच्या वतीने अनेकवेळा रस्ता रोखो, जेलभरो, धरणे आंदोलन, मोर्चे काढण्यात आले. मात्र आश्वासनांच्या पलीकडे प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. सदर वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावे. डुम्मे व तुमरगुंडा येथील वनहक्क दावेदारांच्या पात्र शेतींचे जीपएसने मोजणी करावी, वनहक्क प्रदान करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना शिटप्रमाणे सातबारा द्यावा, दावेदाराचे नाव इतर कॉलममध्ये न टाकता भूमीस्वामी भोगवटदारमध्ये त्याचा समावेश करावा, एटापल्ली शहराला रोज पाणीपुरवठा करण्यात यावा, बांडे नदीवर टँक बसवून पाईपलाईनने पाणीपुरवठा करावा, एटापल्ली येथे क्रिडांगणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, व्यायामशाळा उपलब्ध करून द्यावी, जिल्हास्तरीय वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दाव्यांवर त्वरित प्रक्रिया करून आंदोलनकर्त्यांना वनहक्क प्रदान करावे आदी मागण्यांसाठी सोमवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. आंदोलनाचे नेतृत्व जनहितवादी युवा समिती एटापल्लीचे संयोजक सुरेश बारसागडे, अहेरी जिल्हा निर्माण समितीचे राजू गोटा करीत आहेत. याच मागण्यांसाठी यापूर्वीही अनेकवेळा आंदोलन करण्यात आले आहे. मात्र मागण्या पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे आताचे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रशासनाचीही तारंबळ उडाली आहे. मागण्यांचे निवेदन तहसीलदार संपत खलाटे यांना देण्यात आले व त्यांच्यासोबत विविध मुद्यांवर सुरेश बारसागडे व शिष्टमंडळाने चर्चा केली. या चर्चेदरम्यान तालुकास्तरावरील समस्या तत्काळ सोडविल्या जातील व इतर मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)