शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

वाहतूक दिव्यांची दुरूस्ती रखडली

By admin | Updated: December 20, 2014 22:39 IST

शहरातील इंदिरा गांधी चौकातील वाहतूक दिव्यांची दुरूस्ती करण्यावरून नगर परिषद व वाहतूक शाखेमध्ये वाद सुरू झाल्याने शहरातील वाहतूक दिव्यांची दुरूस्ती रखडली आहे.

गडचिरोली : शहरातील इंदिरा गांधी चौकातील वाहतूक दिव्यांची दुरूस्ती करण्यावरून नगर परिषद व वाहतूक शाखेमध्ये वाद सुरू झाल्याने शहरातील वाहतूक दिव्यांची दुरूस्ती रखडली आहे. इंदिरा गांधी चौकात चामोर्शी, आरमोरी, धानोरा व मूल येथून येणारे चारही मुख्य मार्ग मिळतात. त्याचबरोबर शहरातील हे एकमेव मुख्य चौक असल्याने या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्याचबरोबर तेलंगणा व छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या ट्रेलरही याच चौकातून जातात. मात्र या ठिकाणी वाहतूक दिवे नसल्याने वाहतुकीची कोंडी होऊन अपघातांचे प्रमाणही वाढले होते. ही बाब लक्षात घेऊन बिल्ट प्रशासनाने सुमारे ४ लाख रूपये खर्चून २००९ साली इंदिरा गांधी चौकात वाहतूक दिवे बसवून दिले. सदर वाहतूक दिवे गडचिरोली शहर वाहतूक शाखेला हस्तांतरीत केले. तीन वर्ष वाहतूक दिवे व्यवस्थित चालल्यानंतर वाहतूक दिव्यांच्या केबलमध्ये बिघाड निर्माण झाला. वाहतूक दिवे दुरूस्तीसाठी जवळपास दीड लाख रूपयांचा खर्च अपेक्षीत आहे. मात्र एवढा मोठा निधी वाहतूक शाखेकडे उपलब्ध नसल्याने नगर परिषदेने या वाहतूक दिव्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी केली. मात्र वाहतूक दिवे आपल्याकडे हस्तांतरीत झाले नाही. त्याचबरोबर बंदस्थितीतील असलेल्या वाहतूक दिव्यांची मालकी स्वीकारण्यास नगर परिषदेने नकार दिला. वाहतूक शाखेकडून दंडाच्या रूपात गोळा होणाऱ्या शुल्कातून काही शुल्क नगर परिषदेकडे जमा केल्या जाते. या निधीतून तरी वाहतूक दिव्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहतूक शाखेने केली. मात्र नगर परिषदेने वाहतूक दिवे दुरूस्त करण्यास नकार दिला. नगर परिषद व वाहतूक शाखा यांच्यातील वाद जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला. वाहतूक दिव्यांची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक दिव्यांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार नगर परिषदेने आता अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली असून वाहतूक दिवे दुरूस्तीसाठी जवळपास १ लाख ३० हजार रूपये खर्च येईल, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली. वाहतूक दिवे लवकर दुरूस्त व्हावेत यासाठी वाहतूक दिवे दुरूस्तीची निविदा मागितली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक दिवे दुरूस्ती होण्यासाठी जवळपास २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.