शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

स्थानकासाठी परिवहनमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:59 IST

चामोर्शी येथील बसस्थानकाला जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आ.डॉ.देवराव होळी यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देआमदारांचे निवेदन : चामोर्शीत प्रवाशांचे हाल दूर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी येथील बसस्थानकाला जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आ.डॉ.देवराव होळी यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.चामोर्शी हे जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर आहे. शेकडो गावे चामोर्शी शहराच्या सभोवताल वसली आहेत. त्यामुळे चामोर्शी येथे बस व प्रवाशांची वर्दळ राहते. मात्र बसस्थानक नसल्याने मुख्य मार्गाच्या बाजूला बसेस उभ्या केल्या जातात. तर प्रवाशांनाही रस्त्यावरच उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे चामोर्शी येथे बसस्थानक होणे आवश्यक आहे. जागेचा तिढा मागील अनेक वर्षांपासून कायम राहिला आहे. आ.डॉ.देवराव होळी यांनी जागेचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली. रावते यांनी एसटीचे बांधकाम विभागातील महाव्यवस्थापक जवंजाळ यांच्यासोबत बोलणी करून चामोर्शी येथील जागेचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, असे आवाहन केले.यावेळी आमदारांसोबत भाजपाचे संघटनमंत्री रवींद्र ओल्लालवार, भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, गडचिरोली-चंद्रपूर विभागाचे विभागीय अभियंता राहुल मोडक उपस्थित होते.