शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेली जिल्ह्यातील चार एसडीपीओंच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 21:45 IST

Gadchiroli News राज्य शासनाच्या गृहविभागाने पाेलिस दलातील पाेलिस उपअधीक्षक/सहायक पाेलिस आयुक्त नि:शस्त्र संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या २२ मे राेजी केल्या. यात गडचिराेली जिल्ह्यातील चार उपविभागीय पाेलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

गडचिराेली : राज्य शासनाच्या गृहविभागाने पाेलिस दलातील पाेलिस उपअधीक्षक/सहायक पाेलिस आयुक्त नि:शस्त्र संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या २२ मे राेजी केल्या. यात गडचिराेली जिल्ह्यातील चार उपविभागीय पाेलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. जिल्ह्यातून चार एसडीपीओ बदली हाेऊन गेले असले, तरी केवळ एका नवीन एसडीपीओची नियुक्ती गृहविभागाने केली आहे. धानाेरा, अहेरी व अनुसूचित जमाती पडताळणी समितीत नवीन अधिकाऱ्यांना पदस्थापना दिली नसल्याने, येथील पद सध्या तरी रिक्त राहील.

गडचिराेलीचे उपविभागीय पाेलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांची बदली सांगली जिल्ह्याच्या मिरज उपविभागीय पाेलिस अधिकारी पदावर केली. त्यांच्या जागी उपविभागीय पाेलिस अधिकारी म्हणून पुणे जिल्ह्याच्या पिंपरी- चिंचवडचे सहायक पाेलिस आयुक्त प्रशांत अमृतकर हे येणार आहेत. याशिवाय धानाेराचे उपविभागीय पाेलिस अधिकारी स्वप्निल जाधव यांची बदली पुणे जिल्ह्याच्या दाैंड येथे, अहेरीचे उपविभागीय पाेलिस अधिकारी अमाेल ठाकूर यांची बदली सातारा जिल्ह्याच्या कराड येथे एसडीपीओ पदावर झाली. गडचिराेली येथील अनुसूचित जमाती पडताळणी समिती कार्यालयातील पाेलिस उपअधीक्षक संजीव नारकर यांची बदली बृहन्मुंबईचे सहायक पाेलिस आयुक्त या पदावर गृहविभागाने केली.दाेन सहायक समादेशकांची बदलीसशस्त्र पाेलिस उपअधीक्षक/सहायक समादेशक, राज्य राखीव पाेलिस बल या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्याही २२ मे राेजी गृहविभागाने केल्या. गडचिराेली जिल्ह्यातून वडसा (देसाईगंज) येथील राज्य राखीव पाेलिस बलगट क्रमांक १३ चे सहायक समादेशक ईश्वर चाैधरी यांची बदली सहायक समादेशक राज्य राखीव बल गट क्र. २ पुणे येथे झाली, तर वडसा येथीलच सहायक समादेशक दशरथ जांभुळकर यांची बदली सहायक समादेशक राज्य राखीव पाेलिस बल गट क्रमांक-४ नागपूर येथे झाली, तर वडसा येथील गट क्रमांक १३ चे नवीन सहायक समादेशक म्हणून नागपूरच्या गट क्रमांक ४ चे सहायक समादेशक ललीत मिश्रा यांची पदस्थापना करण्यात आली.

टॅग्स :Policeपोलिस