लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : मेडीगड्डा प्रकल्पासाठी आणखी काही गावातील शेतकºयांच्या शेतजमिनी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. यात पोचमपल्ली, आईपेठा, वडधम आदी गावांचा समावेश आहे. काही शेतकºयांच्या वर्ग-२ मध्ये असल्याने ते रितसर प्रक्रियेद्वारे वर्ग-१ मध्ये रूपांतर करूनच हस्तांतरणाची प्रक्रिया करता येईल. वर्ग २ मधील शेतजमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरित करा, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी बुधवारी दिले.सिरोंचा येथे तहसील कार्यालय व नगर पंचायतीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकाºयांनी मेडीगड्डा प्रकल्पाच्या अधिकाºयांशी प्रकल्पाबाबत चर्चा केली. नगर पंचायत कार्यालयातील आढावा बैठकीत विकासात्मक बाबी व अन्य समस्यांवरही चर्चा करण्यात आली.ख्र्रिश्चन मिशनरीकडे शासनाची ६३ एकर जागा अनेक वर्षांपासून लिजवर असून यातील १० एकर जमीन नगर पंचायतीला मिळवून देण्याची मागणी याप्रसंगी नगरसेवकांनी केली. त्यावर उपविभागीय अधिकाºयांनी त्याची कागदपत्रे तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला नगराध्यक्ष राजू पेदापल्ली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भांबरे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी भारत नंदनवार, नगरसेवक सतीश भोगे, उपाध्यक्ष तथा सभापती पठाण, मुमताज बेगम हुसेन खान, बांधकाम सभापती कुमरी मासर्ला सीमा रामास्वामी, तोकला, विजयकुमार, ईश्वरी बुद्धावार, रवीकुमार रालबंडीवार, शेख अब्दुल रऊफ, नरेशकुमार अलोणे, सरोजना मग्गीडी, नागेश्वर गगापुरपू उपस्थित होते.नगरसेवकांसाठी कार्यशाळा घेणारनगरसेवकांनी विविध विकासात्मक कामे व समस्या यावेळी मांडल्या. नगर पंचायत अस्तित्त्वात येताना कोणतेही ठराव पारित न करता नाली उपसण्याचे काम करण्यात आले होते. त्याची रक्कम अद्यापही मिळाली नसल्याचे जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली असता, या कामाचे पैसे आता देणे शक्य होणार नाही, असे त्यांनी सांगितले. नगर पंचायतीच्या पदाधिकाºयांनी आपल्या अधिकारांची माहिती नसल्याचे सांगितले असता, प्रत्येक विभागाच्या पदाधिकाºयांच्या कर्तव्याचे परिपत्रक त्यांना देण्याचे निर्देश मुख्याधिकाºयांना दिले. नवीन नगर पंचायत अस्तित्त्वात आल्यामुळे नगरसेवक व पदाधिकाºयांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नायक यांनी सांगितले.
हस्तांतरणासाठी शेत जमिनी वर्ग-१ मध्ये आणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:23 IST
मेडीगड्डा प्रकल्पासाठी आणखी काही गावातील शेतकºयांच्या शेतजमिनी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे.
हस्तांतरणासाठी शेत जमिनी वर्ग-१ मध्ये आणा
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांचे निर्देश : सिरोंचात तहसील कार्यालय व नगर पंचायतीच्या कामांचा आढावा