शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जीएनएम इमारतीचे हस्तांतरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 23:35 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवायफरी) प्रशिक्षणासाठी महाविद्यालय व वसतिगृहाच्या प्रशस्त इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र या इमारतींचे हस्तांतरण रखडले आहे.

ठळक मुद्देबांधकाम पूर्ण : कंत्राटदाराचे बिल न दिल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवायफरी) प्रशिक्षणासाठी महाविद्यालय व वसतिगृहाच्या प्रशस्त इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र या इमारतींचे हस्तांतरण रखडले आहे.गडचिरोली येथे एएनएम (आॅक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी) चे प्रशिक्षण महाविद्यालय होते. मात्र जीएनएम अभ्यासक्रमाची सोय नव्हती. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर यावर्षी जीएनएम अभ्यासक्रम सुरु करण्यास मेडिकल कॉन्सिलने परवानगी दिली आहे. जीएनएम अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची प्रक्रिया जवळपास पार पडण्याच्या मार्गावर आहे. जीएनएम अभ्यासक्रमासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात महाविद्यालय व वसतिगृहाच्या प्रशस्त इमारती बांधल्या आहेत. इमारत बांधकाम पूर्ण होऊन जवळपास सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र कंत्राटदाराचे जवळपास १० कोटी रूपयांचे बिल रखडले आहे. त्यामुळे इमारतीचे हस्तांतरण रखडले आहे. यावर्षीपासून जीएनएम अभ्यासक्रमाची पहिली बॅच सुरू होत आहे. त्यामुळे महाविद्यालयाची इमारत हस्तांतरित होणे आवश्यक होते.सद्य:स्थितीत एएनएम महाविद्यालयाच्या इमारतीतच जीएनएमचे प्रशिक्षण सुरू करावे लागणार आहे. एएनएम महाविद्यालयाची इमारतही फारशी मोठी नाही. त्यामुळे दोन्ही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना प्रशिक्षण देताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. इमारतीचे हस्तांतरण होण्यासाठी कंत्राटदाराला कामाचे बिल देणे हाच एकमेव उपाय आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. कृषी महाविद्यालयाची इमारत बांधून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र कंत्राटदाराचे बिल रखडल्याने कोट्यवधी रूपयांची इमारत धूळखात आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या लहानशा इमारतीत कृषी महाविद्यालय भरविले जात आहे. हीच बाब जीएनएम महाविद्यालयाच्या इमारतीबाबत होणार नाही, यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.प्रवेश प्रक्रिया आटोपण्याच्या मार्गावरजीएनएम अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होऊन संबंधित उमेदवारांनी प्रवेश घेण्याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे. यावर्षी प्रथम वर्षाला १० प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पुढील वर्षीपासून प्रथम वर्षाला २० प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सदर अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे.बेड संख्या वाढविण्याचा प्रस्तावजिल्हा सामान्य रुग्णालयाची बेड क्षमता सद्य:स्थितीत २८६ एवढी आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन ३५० बेड संख्या वाढवून मिळावी, असा प्रस्ताव जिल्हा रुग्णालयातर्फे शासनाकडे सादर केला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीय