शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीत निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

By admin | Updated: October 28, 2015 01:43 IST

अहेरी नगर पंचायत व काही ग्राम पंचायतींची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासाठी निवडणूक विभागाच्या मार्फतीने तयारी सुरू केली ...

अहेरी : अहेरी नगर पंचायत व काही ग्राम पंचायतींची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासाठी निवडणूक विभागाच्या मार्फतीने तयारी सुरू केली असून याचाच एक भाग म्हणजे नगर पंचायतीच्या भवनात निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना अंतिम प्रशिक्षण देण्यात आले. अहेरी नगर पंचायतीत एकूण १७ प्रभागांकरिता २० मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यात ८० निवडणूक अधिकारी व दोन झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याबरोबर रेपनपल्ली व कमलापूर या दोन ग्राम पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक, बोरी ग्राम पंचायतीची पोट निवडणूक घेण्यात येणार आहे. ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी नऊ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून ३६ निवडणूक अधिकारी व दोन झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दामरंचा व येरमणार येथील निवडणुका बिनविरोध झाल्या. तर पल्ले ग्राम पंचायतीत एकही आवेदनपत्र सादर झाले नाही.निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी टी. एस. राऊत व तलाठी एकनाथ चांदेकर यांनी पॉवर पार्इंटद्वारे प्रशिक्षण दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार एस. आर. पुप्पलवार, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार (निवडणूक) सत्यनारायण सिलमवार, ग्राम पंचायत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून टी. एस. राऊत व सहायक अधिकारी म्हणून तलाठी एकनाथ चांदेकर काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी)