शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

पुलाअभावी रहदारीची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST

नाल्यावर उंच स्वरूपाचा पूल नसल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पूरपरिस्थितीमुळे या भागातील वाहतूक दोन ते तीन दिवस ठप्प होत असते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने सदर नाल्यावर उंच पूल बांधला नाही. पुढील पावसाळ्यापर्यंत तरी पुलाची निर्मिती होणार का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

ठळक मुद्देखारडी नाल्यावर उंच पूल नाही : शासन व प्रशासनाचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्याच्या मानापूर, देलनवाडी परिसरातील देलनवाडीपासून चार किमी अंतरावर असलेल्या पिसेवडधा गावाजवळ खारडी नाला आहे. मात्र या नाल्यावर उंच स्वरूपाचा पूल नसल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पूरपरिस्थितीमुळे या भागातील वाहतूक दोन ते तीन दिवस ठप्प होत असते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने सदर नाल्यावर उंच पूल बांधला नाही. पुढील पावसाळ्यापर्यंत तरी पुलाची निर्मिती होणार का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.सहा वर्षांपूर्वी सदर नाल्यावर रपटा बांधण्यात आला. मात्र या रपट्याची उंची अतिशय कमी असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने पावसाळ्यात हा रपटा कुचकामी ठरला आहे. पिसेवडधा येथील नदीवर पूल झाल्यामुळे कोरची, कुरखेडापासूनची सर्व वाहने गडचिरोलीसाठी शॉर्टकट रस्ता म्हणून याच मार्गाने आवागमन करतात. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक वाढली आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसात हलक्याशाही पावसाने दोन ते तीन दिवस सदर मार्गावरील वाहतूक ठप्प होते.कुरखेडावरून कसारी मार्गे या भागात फेरा मारून यावे लागते. यात वाहनधारकांचा बराच वेळ वाया जातो. खारडीच्या नाल्यावर पुलाची निर्मिती करणे आवश्यक आहे. यासंदर्भात पिसेवडधा ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र याकडे लक्ष देण्यात आले नाही. खारडी, पिसेवडधा, मानापूर, दवंडी, भाकरोंडी, खडकी, कुलकुली, मोहझरी आदी परिसरातील लोकांना पावसाळ्यात ठेंगण्या रपट्यामुळे त्रास सहन करावा लागतो. गतवर्षीच्या पावसाळ्यातही मानापूर भागातील वाहतूक पूरपरिस्थितीमुळे अनेकदा विस्कळीत झाली होती. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. परिणामी खारडी नाल्यावर पाणी चढले होते. पाच ते सहा दिवस अधून-मधून वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आतातरी ठोस नियोजन करून पारडी नाल्यावर उंच पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा