शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 22:09 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा-कोरची मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून ओव्हरलोड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे.

ठळक मुद्देकुरखेडा-कोरची मार्गावर वाहनांच्या रांगा : ३६ टन लोखंडी सळाखीची सुरू होती वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा/कोरची : गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा-कोरची मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून ओव्हरलोड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. दरम्यान कुरखेडा-कोरची मार्गावर असलेल्या घाटावर ट्रक उलटल्याने शुक्रवारी १२ वाजतापासून तर गुरूवारी सायंकाळी ४.१५ वाजतापर्यंत वाहतूक ठप्प पडली होती. उलटलेला ट्रक रस्त्याच्या मधोमध असल्याने तब्बल १५ तास या मार्गावरील वाहतूक बंद होती. परिणामी या मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूरवरून तब्बल ३६ टन लोखंडी सळाख घेऊन ट्रक रायपूरकडे जात होता. दरम्यान ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कोरची घाटावरील वळणावर ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटला. त्यामुळे हा मार्ग बंद पडला. सदर घटना रात्री १२ वाजता घडली असली तरी गुरूवारी दुपारी २.३० वाजता घटनास्थळी क्रेन पोहोचली. या क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या ट्रकला बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळी ४.१५ वाजतानंतर ट्रक बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर ४.३० वाजतापासून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. कुरखेडा-कोरची मार्गावरून नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात आंतरराज्य स्तरावरील जड वाहतूक सुरू आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे.ओव्हरलोड वाहतुकीमुळे या रस्त्याची पूर्णत: चाळण झाली आहे. परिणामी या मार्गावरून प्रवाशांना जीव मुठीत घालून धोकादाय प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सदर मार्गावरील ओव्हरलोड वाहतुकीला आळा घालण्याची मागणी होत आहे.