लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची येथील मुख्य बाजार चौकाच्या परिसरात अनेक वाहने दिवसभर आवागमन करतात. मात्र रस्त्यालगतच्या दुकानदारांनी अतिक्रमण करून आपली दुकाने पुढे आणली आहेत. परिणामी रस्ता अरूंद झाल्याने या परिसरात वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे येथील अतिक्रमण काढावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.कोरचीच्या बाजार चौकातून शासकीय आश्रमशाळा बोटेकसा व छत्तीसगडकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात जड वाहने आवागमन करतात. मात्र रस्ते अरूंद असल्याने अनेकदा वाहतूक विस्कळीत होत असले. परिणामी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कोरची येथील आठवडी बाजार गुरूवारी असतो. आठवडी बाजाराच्या दिवशी तालुक्याच्या ग्रामीण भागातून हजारो लोक खरेदीसाठी येतात. तसेच कोरची येथे नगर पंचायत असल्याने कर्मचारीही मोठ्या प्रमाणात वास्तव्यास राहतात. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढल्यामुळे कोरची शहरात वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र रस्ते रूंद न झाल्याने वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न आणखीनच जटील झाला आहे.येथील अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झालेली आहे. काही ठिकाणच्या नाल्याही खचलेल्या आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचाही योग्य निचरा होण्यास अडचणी होतात. पाऊस आल्यानंतर रस्त्यावरून पाणी वाहते. स्थानिक प्रशासनाने येथील नाल्यांमध्ये नियमित फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.बाजारासाठी अपुरी जागाबाजार भरविण्यासाठी जागा कमी पडत असल्याने लहान दुकानदार रस्त्यालगत आपली दुकाने लावतात. यामुळे रस्त अरूंद होऊन आवागमन करण्यास वाहनांना प्रचंड अडचण येते. आठवडी बाजाराच्या दिवशी कोरची येथील चौकातून विद्यार्थी व नागरिकांना योग्यरित्या आवागमनही करता येत नाही. त्यामुळे येथे नेहमी वाहतुकीची समस्या निर्माण होते. स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करावी, अथवा बायपास रस्त्याची व्यवस्था करावी. तसेच बाजाराच्या दिवशी वेगळया मार्गाने वाहतूक वळती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:27 IST
कोरची येथील मुख्य बाजार चौकाच्या परिसरात अनेक वाहने दिवसभर आवागमन करतात. मात्र रस्त्यालगतच्या दुकानदारांनी अतिक्रमण करून आपली दुकाने पुढे आणली आहेत.
अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी
ठळक मुद्देअरूंद रस्त्याने वाहतुकीची समस्या : दुकानदारांचे अतिक्रमण वाढल्याचा परिणाम