शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

परजिल्ह्यातील 74 काेराेना रूग्णांनी गडचिराेलीत घेतला अखेरचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रूग्णांसाठी ऑक्सिजनची गरज भासत हाेती. भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचे बेड उपलब्ध हाेत नसल्याने हे रूग्ण गडचिराेली येथे रेफर केले जात हाेते. काही रूग्ण अतिशय गंभीर असल्याने त्यांना वाचविण्यात आराेग्य यंत्रणेला यश आले नाही व त्यांचा मृत्यू झाला. गडचिराेली जिल्ह्यात वर्षभरात ३२२ काेराेनाबाधितांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देगंभीर स्थितीत जिल्हा रूग्णालयात झाले हाेते दाखल; चंद्रपूर, भंडारातील सर्वाधिक मृतक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाचा संसर्ग झालेल्या दुसऱ्या जिल्ह्यातील रुग्णांना गडचिराेली जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी भरती केल्यानंतर यापैकी सुमारे ७४ रुग्णांनी गडचिराेली जिल्हा रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गडचिराेलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गडचिराेली शहरापासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर चंद्रपूर जिल्ह्याची सीमा आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, ब्रह्मपुरी व मूल तालुक्यांतील बहुतांश रूग्ण हे चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी न जाता, गडचिराेली येथेच येतात. काेराेनाच्या साथीत गडचिराेली जिल्ह्यात काेराेना रूग्णांची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी हाेती व आताही आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रूग्णांसाठी ऑक्सिजनची गरज भासत हाेती. भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचे बेड उपलब्ध हाेत नसल्याने हे रूग्ण गडचिराेली येथे रेफर केले जात हाेते. काही रूग्ण अतिशय गंभीर असल्याने त्यांना वाचविण्यात आराेग्य यंत्रणेला यश आले नाही व त्यांचा मृत्यू झाला. गडचिराेली जिल्ह्यात वर्षभरात ३२२ काेराेनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यातील ७२ रूग्ण हे चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील आहेत तर दाेन रूग्ण दुसऱ्या राज्यातील आहेत. २४८ रूग्ण गडचिराेली जिल्ह्यातील आहेत.  

गडचिराेलीतच ठेवला देहकाेराेनामुळे मृत्यू झाल्यास संबंधिताचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. नगर परिषदेचे कर्मचारी आराेग्य विभागाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार गडचिराेली येथे अंत्यविधी करतात. यात केवळ एक ते दाेन जवळच्या नातेवाईकांना अंत्यविधीचे कार्य पार पाडण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. आपला अंत्यविधी गडचिराेलीत हाेईल, असे अनेकांना जिवंत असताना मनातही आले नसेल, मात्र काेराेनाच्या महामारीमुळे त्यांच्या मृतदेहावर गडचिराेलीतच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. 

मृत्यूचे सत्र सुरूचकाेराेनामुळे मृत्यूचे सत्र मागील महिनाभरापासून सुरूच आहे. ४० ते ५० वर्ष वयाेगटातील नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू हाेत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संचारबंदी लागू होऊन आता १४ दिवसांचा कालावधी उलटला  तरी काेराेनाबाधितांची संख्या कमी न हाेता वाढतच   आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू