शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अव्वल कारकुनाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:10 IST

येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बनावट शिक्के तयार करून खोट्या सह्यानिशी जमिनींचे व्यवहार केल्याप्रकरणी अव्वल कारकून दुष्यंत कोवे याला शनिवारी अटक करण्यात आली. या प्रकरणात झालेली ही दुसरी तर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याची पहिलीच अटक आहे.

ठळक मुद्देबनावट जमीन व्यवहार प्रकरण : अहेरीत दुसरा मोहरा जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बनावट शिक्के तयार करून खोट्या सह्यानिशी जमिनींचे व्यवहार केल्याप्रकरणी अव्वल कारकून दुष्यंत कोवे याला शनिवारी अटक करण्यात आली. या प्रकरणात झालेली ही दुसरी तर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याची पहिलीच अटक आहे. यापूर्वी ३ जुलै रोजी सिरोंच्या तहसील कार्यालयातील लिपीक मल्लय्या कासेट्टी याला अटक झाली होती.सिरोंचा तालुक्यातील मेडीगड्डा येथील जमिनी बनावट शिक्क्यांचा वापर करून भोगवटदार वर्ग २ ची जमिनी भोगवटदार वर्ग १ मध्ये परावर्तित करण्यात आली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून दुष्यंत कोवे पोलीस कारवाई होण्यापूर्वीच फरार झाला. त्याने जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला होता. परंतु दोन्ही न्यायालयाने अपील खारीज केल्याने सिरोंचा पोलीस विभागाने फरार दुष्यंत कोवेला पकडण्यासाठी सापळा रचला आणि शनिवारी (दि.२५) सिरोंचा बस स्थानकावर त्याला अटक करण्यात आली.कोवे याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने नाकारल्यानंतर तो तेलंगणा राज्यात जाणार अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी सापळा रचला व त्याला अटक केली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास चालू असून यासाठी अप्पर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे यांच्या नेतृत्वात एक टीम तयार केली आहे.आता तपासाला येणार गतीहे प्रकरण उघडकीस येण्याच्या दोन दिवसांपूर्वीच दुष्यंत कोवे याची अहेरी येथून गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली होती. मात्र बनावट जमीन व्यवहार प्रकरण उघडकीस आल्याचे कळताच तो जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून फरार झाला होता. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणात तपासाला वेग येणार आहे. सिरोंचा परिसरातील जमिनीचे व्यवहार करणारी काही मंडळी तसेच महसूल विभागातील काही अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी व तलाठ्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा