शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
3
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
4
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
5
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
6
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
7
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
8
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
9
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
10
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
11
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
12
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
14
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
15
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
17
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
18
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
19
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
20
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   

आजचा युवक आत्मकेंद्रित; सामाजिक समस्या साेडविण्याकडे फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST

देसाईगंज येथील आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि राष्ट्रनेत्यांच्या स्वप्नातील ...

देसाईगंज येथील आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि राष्ट्रनेत्यांच्या स्वप्नातील भारत’ या विषयावरील आभासी वक्तृत्व स्पर्धा आयाेजित करण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रासह बिहार,पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. एच. बी. धोटे, वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. जे. पी. देशमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. निहार बोदेले यांनी केले. स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यांना अनुक्रमे १ हजार व ५०० रुपये किमतीचे ग्रंथ साहित्य व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयाे विभागाच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. यशस्वीतेसाठी प्रा. निहार बोदेले, प्रा. नीलेश यांनी सहकार्य केले.

बाॅक्स

हे ठरले विजेते

वक्तृत्व स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कर्नाटक विद्यापीठ, धारवाड अंतर्गत गुडलेप्पा हल्लीकेरी महाविद्यालय, हवेरी, कर्नाटक येथील विद्यार्थिनी ऐश्वर्या मंजुनाथ मानेगार हिने पटकावले तर द्वितीय क्रमांक गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी, (महाराष्ट्र) येथील विद्यार्थिनी प्रियंका श्यामराव ठाकरे हिने पटकाविला.