लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या चार दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. चवथ्या दिवशी शुक्रवारला गडचिरोली व अहेरी आगारातील कर्मचारी आंदोलनावर होते. एसटी कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत शासनस्तरावरून कोणताही ठोस निर्णय घेण्यात न आल्याने हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय राज्य परिवहन कर्मचारी कृती समिती गडचिरोलीच्या वतीने घेण्यात आला आहे. शनिवारपासून आगारातील सर्व एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरून बाजारपेठेत ‘भिक मांगो आंदोलन’ करणार आहेत.१ एप्रिल २०१६ पासून एसटी कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांना मिळणाºया वेतनश्रेणी, वेतन, विविध भत्ते, सेवासवलतीसह सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, वाढीव सात टक्के महागाई भत्ता व महागाई भत्त्याची थकबाकी तत्काळ अदा करण्यात यावी, एसटी कर्मचाºयांना बोनस देण्यात यावा, कर्मचाºयाचा अपघाती मृत्यू झाल्यास प्रवाशांप्रमाणे १० लाख रूपये तसेच मृत कर्मचाºयाच्या पाल्यास अनुकंपातत्त्वावर शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्यात यावी आदीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून एसटी कर्मचाºयांनी आंदोलन सुरू केले आहे.एसटी कर्मचाºयांच्या आंदोलनामुळे ऐन दिवाळी सणाच्या काळात भाऊबिजेनिमित्त गावाला जाणाºया प्रवाशांची प्रचंड अडचण झाली. गडचिरोली शहरातील चामोर्शी, आरमोरी, धानोरा व चंद्रपूर मार्गावरील बसथांब्यावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स, काळीपिवळी टॅक्सी, आॅटो वाहनधारकांनी क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी बसवून गेल्या चार दिवसांपासून वाहतूक सुरू केली आहे. विशेष म्हणजे गडचिरोली आगार परिसरातूनही प्रवाशांना बसविण्यासाठी महामंडळाने परवानगी दिली असल्याने आगार परिसरातून अनेक खासगी वाहनधारक प्रवाशी घेत असल्याचे दिसून येत आहे. एसटी कर्मचाºयांचा संप सुरू असल्याने गडचिरोली आगारातील शेकडो बसेस वर्कशॉप परिसरात उभ्या ठेवण्यात आल्या आहेत. बसस्थानक परिसर बसेस व प्रवाशाविना पूर्णत: ओसाड दिसून येत आहे.गडचिरोली आगार परिसरात एसटी कर्मचाºयांचे धरणे आंदोलन शुक्रवारी सुरूच होते. या धरणे आंदोलनात नीलेश वाट, एल.बी. चौधरी, किशोर चौधरी, विलास भुरसे, अशोक लेभाडे, गजानन नागोसे, विनोद धकाते, दीपक मांडवे, अशोक सुत्रपवार, रेखा बाळेकरमकर, माला सहारे, विना मत्ते, किशोर लिंगनवार, भागडकर आदी कर्मचारी हजर होते.
आजपासून एसटी कर्मचारी मागणार भीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:34 IST
गेल्या चार दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. चवथ्या दिवशी शुक्रवारला गडचिरोली व अहेरी आगारातील कर्मचारी आंदोलनावर होते.
आजपासून एसटी कर्मचारी मागणार भीक
ठळक मुद्देचवथ्या दिवशीही संप कायमच : गडचिरोली व अहेरी आगार परिसरात शुकशुकाट; दिवाळी सणाच्या आनंदावर विरजण