उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रणरागिणींचा होणार गौरवगडचिरोली : विविध क्षेत्रात निरंतर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याचा २५ आॅक्टोबर २०१६ रोजी लोकमत सखी मंच सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम प्रेस क्लब भवन धानोरा रोड गडचिरोली येथे दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व प्रसिद्धीपासून दूर असलेल्या महिलांच्या कार्याला जगासमोर आणण्याचा या पुरस्काराच्या माध्यमातून प्रयत्न आहे. या कार्यक्रमाला सखी मंच सदस्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सदर कार्यक्रम संपल्यानंतर गीतगायन स्पर्धा, एकलनृत्य व एकपात्री अभिनय स्पर्धा आदी घेण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच संयोजिका प्रीती मेश्राम (९५९५४३२९८८), बालविकास मंच संयोजिका किरण पवार (८००७१०९३१०), युवा नेक्स्ट संयोजिका वर्षा पडघन (९४२१००३९४९) यांच्याशी संपर्क साधावा. (शहर प्रतिनिधी)यांचा होणार गौरवया कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्कार देऊन राणी रूख्मीणीदेवी सत्यवानराव आत्राम यांना सन्मानित केले जाणार आहे. तर कला क्षेत्रातून छाया अरविंद पोरेड्डीवार, सामाजिक क्षेत्रातून डॉ. सुधा शांतीलाल सेता, उद्योग व व्यवसाय क्षेत्रातून प्रीती संजय सोनकुसरे, शैक्षणिक क्षेत्रातून भाग्यलक्ष्मी खोब्रागडे, वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. अनघा दिगंत आमटे व शौर्य क्षेत्रातून तेजस्वी पाटील, क्रीडा क्षेत्रातून अवंती गांगरेड्डीवार यांना सन्मानित केले जाणार आहे.
आज लोकमत सखी सन्मान अवॉर्ड
By admin | Updated: October 25, 2016 00:54 IST