शेतकरी अडचणीत : सावकाराकडील कर्ज वाढलेमालेवाडा : आदिवासी विकास महामंडळाला विक्री करण्यात आलेल्या धानाचे चुकारे फेब्रुवारी महिन्यापासून थकले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. आदिवासी विकास महामंडळ विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या मार्फत धान खरेदी करते. यावर्षी मालेवाडा व परिसरात धान खरेदी केंद्र स्थापन करण्यात आले होते. या केंद्रावर शेकडो शेतकऱ्यांनी लाखो रूपयांचे धान विकले. याबाबीला चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळाले नाही. शेतकरी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी ंसंस्थेच्या कार्यालयात जाऊन चुकाऱ्याबाबत विचारणा करीत आहेत. मात्र शासनाकडूनच पैसे उपलब्ध झाले नसल्याचे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. नवीन खरीप हंगामात धानाची रोवणी करण्यासाठी हजारो रूपये खर्च येतो. धानाच्या विक्रीचा स्वत:चा पैसा मिळाला नाही. परिणामी शेतकऱ्यांना सावकारापुढे हात जोडून कर्ज काढावे लागत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाल आहे. (वार्ताहर)
फेब्रुवारीपासून धानाचे चुकारे थकले
By admin | Updated: July 29, 2015 01:48 IST