शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

कोरपर्सीवासीय भागवितात खड्ड्यातील पाण्यावर तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 11:52 PM

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कोठी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोरपर्सी गावातील हातपंप गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नादुरूस्त स्थितीत आहे. गावात पाणीपुरवठ्याची दुसरी साधने नाहीत. त्यामुळे या गावातील नागरिकांना नाल्याच्या खड्ड्यांमधील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देगावानजीकचा नालाही पडला कोरडा : पाच महिन्यांपासून गावातील हातपंप बंद; प्रशासन कमालीचे सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कोठी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोरपर्सी गावातील हातपंप गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नादुरूस्त स्थितीत आहे. गावात पाणीपुरवठ्याची दुसरी साधने नाहीत. त्यामुळे या गावातील नागरिकांना नाल्याच्या खड्ड्यांमधील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. कोरपर्सी गावात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.जंगलव्याप्त असलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावे यंदाच्या उन्हाळ्यात तहानलेली आहेत. हिरव्या जंगलातील गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून पाण्यासाठी वनवन भटकंती करण्याची वेळ आली आहे. याला सर्वस्वी जबाबदार पंचायत समिती प्रशासन असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कोठी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोरपर्सी गावातील हातपंप गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नादुरूस्त स्थितीत आहे. नागरिकांनी इतके दिवस गावालगतच्या नाल्याच्या पाण्यावर आपली तहान भागविली. मात्र एप्रिल महिन्याच्या अखेरीस नाल्यातील पाणी आटल्याने कोरपर्सीवासीयांपुढे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या पर्लकोटा नदीपात्रात जाऊन नागरिक आंघोळ तसेच कपडे धुत होते. पिण्याचे पाणी सुद्धा याच नाल्यातून घरी न्यावे लागत होते. सदर पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांनी गावातील हातपंप दुरूस्त करण्याची करण्याची मागणी ग्रामसेवकाकडे केली होती. मात्र ग्रामसेवकाने याकडे सर्रास दुर्लक्ष केले. रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. दरम्यान गावालगतच्या नाल्यात नागरिकांनी लहानसा खड्डा खोदला आता गावातील नागरिक या खड्ड्यातील अशुद्ध पाण्यावर आपली तहान भागवित आहेत. पावसाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी गावातील हातपंपाची दुरूस्ती न केल्यास कोरपर्सीवासीयांना नदीच्या नाल्यातील गढूळ पाणी प्यावे लागणार आहे.यासंदर्भात कोठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला संपर्क केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद दाखवित होता. ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने त्यांची भेट घेता आली नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.नारगुंड्यातील दुहेरी नळ योजना नादुरूस्तभामरागड तालुक्याच्या नारगुंडा येथे प्रशासनाच्या वतीने दुहेरी नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून ही नळ योजना बंद स्थितीत आहे. यासंदर्भात भामरागड पंचायत समितीमधील पंचायत विस्तार अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, ते काम आमचे नसून ग्रामसेवकाचे आहे. संबंधित ग्रामसेवकाला आपण याबाबत सांगू, असे म्हणून विस्तार अधिकाऱ्यांनी हात झटकले.पक्क्या रस्त्यांचा अभावघनदाट जंगलात वसलेल्या कोरपर्सी गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. येथील नागरिक पायवाटेने गावाला जातात. दरवर्षीच्या पावसाळ्यात पूर येत असल्याने या गावाचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई