शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील दहावीची विद्यार्थिनी झाली बाळंतीण, मुख्याध्यापकासह तिघे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 05:54 IST

आश्रमशाळेतील दहावीतील विद्यार्थिनी चक्क बाळंतीण होऊन तिने एका सुदृढ मुलीला जन्म..

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील वेलगूर आश्रमशाळेतील दहावीतील विद्यार्थिनी चक्क बाळंतीण होऊन तिने एका सुदृढ मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तसेच दोघा अधीक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, सदर विद्यार्थिनीने दहावीची परीक्षाही दिली आहे. तरी तिच्याबद्दल कोणत्याही शिक्षकाला, अधीक्षकांना संशयही आलानाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.आपल्याच वर्गात शिकणाऱ्या गावाकडच्या विद्यार्थ्यासोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली देऊन कोणाबद्दलही तक्रार नसल्याचे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकाºयांना दिलेल्या जबाबात तिने म्हटले आहे. ती आणि तिचा प्रियकर दोघेही दहावीत असले तरी ते २० वर्षे वयाचे आहेत. यापूर्वी दुसºया गावातील आश्रमशाळेत दोघेही काही वर्ष नापास झालेले आहेत, अशी माहिती सहायक प्रकल्प अधिकारी जी. पी. चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आश्रमशाळेत प्रसवकळा सुरू झाल्यानंतर सुरूवातीला तिला अहेरी व नंतर गडचिरोलीतील सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. तिने एका मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे तिची ‘नॉर्मल डिलिव्हरी’ झाली आहे. रक्ताची कमतरता असल्यामुळे नंतर तिला चंद्रपूरला हलविण्यात आले.यासंदर्भातील तक्रार संस्थेकडून आल्यानंतर अहेरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने तिचा जबाब घेतले. त्यानंतर मुख्याध्यापक एम.एस. कुर्वे, अधीक्षक आर.बी. पोलोजीवार व महिला अधीक्षिका डोंगरे यांना निलंबित केले.वास्तविक प्रत्येक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वर्षातून किमान तीन वेळा वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक असते. ही तपासणी फिरते वैद्यकीय पथक किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक करते, पण प्रत्यक्षात अशी तपासणी केलीच नसल्याचे स्पष्ट होते.आश्रमशाळेतील मुलींची नियमित मासिक पाळी येत असल्याची नोंद दर महिन्याला रजिस्टरमध्ये करावी लागते. पीडितेची मासिक पाळी नियमित येत असल्याची रजिस्टरमध्ये आहे.