शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार हेक्टरवर वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:07 IST

यावर्षीच्या उन्हाळ्यात संपूर्ण जिल्ह्यात १ हजार ३४४ वणव्यांच्या घटनांची नोंद करण्यात आली असून यामध्ये सुमारे २ हजार ७३७ हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाला.

ठळक मुद्दे१ हजार ३४४ घटनांची नोंद : मागील वर्षीच्या तुलनेत आग लागण्याचे प्रमाण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या उन्हाळ्यात संपूर्ण जिल्ह्यात १ हजार ३४४ वणव्यांच्या घटनांची नोंद करण्यात आली असून यामध्ये सुमारे २ हजार ७३७ हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे.मागील वर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाला. त्याचबरोबर नोव्हेंबरनंतर पावसाने कायमची विश्रांती घेतली. त्यामुळे जंगलातील गवत पूर्णपणे सुकले आहे. थोडीशीही आग लागल्यास त्याचे वणव्यात रूपांतर होत आहे. त्यामुळे यावर्षी जंगलाला आगी लागण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.मोहफूल वेचण्यासाठी काही नागरिक मोहाच्या झाडाखाली आग लावतात. पुढे ही आग जंगलभर पसरते. तेंदूपत्ता चांगला यावा, यासाठीही आग लावली जाते. तर शेतातील धसकट जाळण्यासाठी लावलेली आग जंगलापर्यंत पोहोचून त्याचे वणव्यात रूपांतर होते. जंगलाने ये-जा करणारे नागरिक बिडी किंवा सिगारेट पिऊन ती रस्त्याच्या कडेला टाकतात. यामुळेही आग लागते. जंगलाला आगी लागण्याची प्रमुख कारणे आहेत.मागील वर्षी एकूण ९३७ वणवे लागले असल्याची नोंद वन विभागाकडे आहे. या आगींमुळे १ हजार ८१० हेक्टरवरील जंगल जळून खाक झाले. तर यावर्षी जंगलांना आगी लागण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येते. एप्रिलपर्यंत जंगलाला आग लागण्याच्या १ हजार ३४४ घटना घडल्या आहेत. यामध्ये २ हजार ३३७ हेक्टरवरील जंगल जळून खाक झाले.जंगलाला आग लागल्यानंतर ती आग कित्येक दूर पसरते. यामध्ये जीव, जंतू, पक्ष्यांचे घरटे, लहान पशु, सुकलेले लाकूड जळून खाक होतात. यामुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे जंगलांना आगी लागू नये व लागलेली आग तत्काळ विझावी, यासाठी वन विभागातर्फे शर्तीचे प्रयत्न होत असले तरी आगींच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यात वन विभागाला अजूनपर्यंत पाहिजे तेवढे यश मिळाले नाही. वणव्यांमुळे जंगलातील नष्ट होणारी जैवविविधता टिकवून ठेवायची असेल तर वणवे न लागण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यादृष्टीने व्यापक प्रमाणात उपाययोजना कराव्या लागणार आहेत.वन विभागाच्या उपाययोजनाजंगलाला आग लागल्यास जैवविविधतेची मोठ्या प्रमाणात हानी होते. याची कल्पना वन विभागाला असल्याने जंगलाला आग लागू नये, यासाठी वन विभागाच्या मार्फत विशेष उपाययोजना केल्या जातात. यामध्ये फायर लाईन जाळण्याचे काम उन्हाळ्याच्या सुरूवातीला केले जाते. प्रत्येक रेंजमध्ये फिरते वाहन उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे फायर ब्लोअर मशीन देण्यात आली आहे. त्याचबरोबर जंगलाला आग लागू नये, याबाबत मार्गदर्शनही केले जात आहे.सेटलाईटने वेळीच मिळते माहितीदिवसेंदिवस वन विभाग सुध्दा हायटेक होत चालला आहे. देशभरातील कुठेही जंगलाला लागलेल्या आगीची माहिती सॅटेलाईटद्वारे फॉरेस्ट सर्वे आॅफ इंडियाला मिळते. त्यानंतर ज्या क्षेत्रात आग लागली आहे. त्या क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याला एसएमएसद्वारे वणव्याची माहिती दिली जाते. माहिती मिळताच संबंधित कर्मचारी घटनास्थळी पोहोचून आग विझविते. नासा ही आंतरराष्ट्रीय संस्था सुध्दा आगीच्या घटनांची माहिती व्हॉटस्अ‍ॅपद्वारे वन विभागाच्या अधिकाºयांना देते.

टॅग्स :fireआग