शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

आरमोरीतील १३ दारू विक्रेत्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:27 IST

लोकमतने आरमोरी शहरात विविध ठिकाणी विकल्या जाणाऱ्या दारूची माहिती उघड करताच पोलिसांनी गंभीर दखल घेत धडक कारवाईला सुरूवात केली आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लोकमतने दि.१८ व २१ जुलैच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते.

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची दखल : शहरासह तालुक्यात पोलिसांचे धाडसत्र

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : लोकमतने आरमोरी शहरात विविध ठिकाणी विकल्या जाणाऱ्या दारूची माहिती उघड करताच पोलिसांनी गंभीर दखल घेत धडक कारवाईला सुरूवात केली आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लोकमतने दि.१८ व २१ जुलैच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते.वृत्ताची दखल आरमोरीचे ठाणेदार सुरेश चिल्लावार यांनी घेतली. स्वत:च्या नेतृत्वात पोलिसांचे पथक तयार करून आरमोरी तालुका व शहरातील १३ दारू विक्रेत्यांना अटक केली. दोन आरोपी फरार आहेत. त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे आरमोरी तालुक्यातील दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.आरमोरी शहरात दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला होता. याबाबतचे पहिले वृत्त १८ जुलै रोजी प्रकाशित झाले. या वृत्तामुळे दारू विक्रेते हादरून गेले. त्यांना काही पोलिसांचे छुपे पाठबळ असल्याने कारवाई टाळण्यासाठी काही दिवस दारू विक्री बंद होती. मात्र लोकमतने पुन्हा दारू विक्रेत्यांचा डाव उधळत दि.२१ ला बातली प्रकाशित केली. या वृत्ताची दखल ठाणेदार चिल्लावार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली. आरमोरी शहर व तालुक्यात दारू विक्रेत्यांची माहिती मागितली. स्वत:च्या नियंत्रणाखाली पोलिसांचे पथक तयार केले. सोमवारपासून दारू विक्रेत्यांविरोधात कारवाईला सुरूवात केली. पोलिसांनी वडधा येथील प्रेमिला कोडवते, पिपरटोलातील रामदास कुमोटी, वासाळातील निशा मेश्राम, अरसोडा येथील लक्ष्मण सिंग, कतारसिंग, कृष्णा सेलार, वैरागड येथील सुमित्रा मुंगीकोल्हे, काळागोटा येथील राहूल रामटेके, गायकवाड चौकातील नरेश पराते, संतोष सिंग यांच्या घरी धाड टाकून त्यांना अटक केली आहे. मागील तीन दिवसात सुमारे १३ दारू विक्रेत्यांना अटक केली आहे. विविध कारवायांमध्ये २ लाख ६६ हजार रुपयांची दारू, एक चारचाकी, चार दुचाकी वाहने जप्त केली. सदर कारवाई पोलीस निरिक्षक सुरेश चिल्लावार, सहायक पोलीस निरिक्षक पंकज बन्सोड, पीएसआय बाळासाहेब दुधाळ, पोलीस हवालदार गोपाल जाधव, नरेश वासेकर, अकबर कोयाम यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदी