शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आरडातील बोनालू उत्सवात हजारोंची गर्दी, डोक्यावर कलश घेऊन भाविकांची प्रदक्षिणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 17:27 IST

आरडा गावातील मल्लिकार्जुन स्वामी मंदिर परिसरात २३ व २४ डिसेंबर रोजी बोनालू (जत्रा) उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

- नागभूषणम चकिनारपुवारसिरोंचा (गडचिरोली) : तालुकास्थळापासून पाच किमी अंतरावर असलेल्या आरडा गावातील मल्लिकार्जुन स्वामी मंदिर परिसरात २३ व २४ डिसेंबर रोजी बोनालू (जत्रा) उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सिरोंचा तालुक्यातील व तेलंगणा राज्यातील जवळपास 10 हजार भाविकांच्या गर्दीने मल्लिकार्जुन स्वामी मंदिराचा परिसर फुलून गेला होता. आरडा गावात असलेल्या मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात दरवर्षी डिसेंबर महिन्यात जत्रा भरते. यावर्षी सुद्धा जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. मल्लिकार्जुन स्वामी यांचे भक्तगण सिरोंचा तालुक्यासह तेलंगणा व छत्तीसगड राज्यात आहेत. उत्सवादरम्यान विविध प्रकारची दुकाने लागली होती. भक्तगण मल्लिकार्जुन स्वामींचे दर्शन घेऊन पूजाअर्चा करीत होते. आपली मनोकामना पूर्ण व्हावी, यासाठी स्वामींना साकडे घालीत होते. बोनालू म्हणजे एका कलशात प्रसादरूपी खिर शिजविली जाते. शिजलेली खिर सजविलेल्या मडक्यात ठेवली जाते. नंतर ते मडके डोक्यावर घेऊन महिला भाविक मंदिराच्या सभोवताली तीन प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर स्वामींना प्रसाद अर्पण करून उपस्थित भाविकांनाही प्रसाद वाटला जातो. 

मल्लिकार्जुन स्वामी जत्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा आहे. सदर जत्रा भाविक व नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. भाविकांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम या गावात आयोजित केले जातात. जत्रा चांगल्या रितीने पार पाडण्यासाठी आरडा गावातील सरपंच रंगू बापू, सदाशिव रंगुवार, अशोक रंगुवार, किरण वेमुला यांच्यासह गावातील नागरिकांनी सहकार्य केले. जत्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सिरोंचा पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास सुपे, उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी उत्सव मंडळ समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.