शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रोपवाटिकेच्या पाण्यावर भागवितात तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:03 IST

येथील नळ योजनेच्या विहिरीचे बांधकाम सुरू असल्याने मागील तीन महिन्यांपासून नळाला पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांना रोपवाटिकेतील पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देजोगीसाखरातील स्थिती : नळ योजनेच्या विहिरीचे बांधकाम सुरू असल्याने तीन महिन्यापासून योजना बंद

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : येथील नळ योजनेच्या विहिरीचे बांधकाम सुरू असल्याने मागील तीन महिन्यांपासून नळाला पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांना रोपवाटिकेतील पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई येथे निर्माण झाली आहे.पाणी पुरवठा विभाग कुरखेडाच्या वतीने २०१४-१५ या वर्षात जोगीसाखरा लगतच्या नदीमध्ये नळ योजनेच्या विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते. सदर काम करताना जुनी चांगली फिल्टर पाईपलाईन काढून चुकीची नवीन पाईपलाईन व विहीर बांधकाम करण्यात आले. नदीतील विहिरीत बोअरवेल मारले असते तर सुरळीत पाणीपुरवठा झाला असता परंतु नव्याने परत जवळपास नऊ लाख रूपये मंजूर करून नवीन विहीर बांधकामाचे काम हाती घेण्यात आले. सध्या या विहिरीचे बांधकाम नदीत सुरू आहे. नदीपात्रात तीन ते चार फुटापेक्षा अधिक रेतीचा थर नसल्याने विहिरीला पाणी लागले नाही. विहिरीत कुठेतरी झरा मिळेल म्हणून नदीमध्ये शोध सुरू आहे. येथील विहिरी आणि हातपंपांना पाणी येत नसल्यामुळे एक ते दीड किमी अंतरावरून रोपवाटिकेतून पिण्याचे पाणी नागरिकांना आणावे लागते. जोगीसाखरा येथे दिवसेंदिवस पाणी टंचाईची समस्या तीव्र होत असल्याने शासनाने गाढवी नदीवर कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.बंधारे बांधण्याची मागणीगाढवी नदीचे पाणी आटले की, नदी तिरावरील गावांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे या नदीवर मोठे सिंचन बंधारे बांधकाम करण्याची गरज आहे. जोगीसाखरा भागातून वाहणाऱ्या गाढवी नदीवरून परिसरातील अनेक गावांमध्ये नळयोजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात प्रत्येक ठिकाणच्या नळयोजना पाणी ओढत असल्याने नदीतील जलपातळी आपोआपच खालावते. दरवर्षी या नदीवर बंधारे बांधून पाणी अडविले जायचे परंतु मागील दोन वर्षांपासून पाणी अडविले जात नसल्याने नदीतील जलसाठा लवकरच आटतो. त्यामुळे मोठे बंधारे बांधण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई