शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

यंदा गडचिराेलीत अकरावीच्या साडेपाच हजार जागा शिल्लक राहणार; प्रवेश सहज मिळणार

By दिलीप दहेलकर | Updated: May 30, 2024 18:41 IST

दहावी उत्तीर्ण विद्यार्थी संख्येपेक्षा जागा अधिक, विज्ञान, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी या चार शाखा मिळून जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या एकूण १७ हजार ९२० जागा आहेत

गडचिराेली : इयत्ता दहावीचा बाेर्डाचा निकाल २७ मे राेजी ऑनलाइन जाहीर झाला असून, गडचिराेली जिल्ह्यातील एकूण १३ हजार २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गडचिराेली जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या १७ हजारांवर जागा आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी संख्येपेक्षा अकरावी प्रवेशाच्या जागा अधिक असल्याने यंदा शैक्षणिक सत्र २०२४ - २५ मध्ये इयत्ता अकरावीच्या साडेपाच हजार जागा शिल्लक राहणार आहेत.

जिल्ह्यात खासगी अनुदानित, विनानुदानित, जिल्हा परिषद हायस्कूल, शासकीय व खासगी आश्रमशाळा, इंग्रजी माध्यमांच्या शाळा व इतर सर्व शाळा मिळून स्टेट बाेर्डला यंदा १४ हजार २५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले हाेते. यापैकी १३ हजार २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ६ हजार ७३३ मुले तर ६ हजार ५४५ मुलींचा समावेश आहे. जिल्ह्याच्या शहरी भागात सीबीएसईच्या सात ते आठ माध्यमिक आश्रमशाळा आहेत. या शाळांमधून जवळपास एक हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सीबीएसईचे विद्यार्थी विज्ञान शाखेकडे अधिक वळतात, हा दरवर्षीचा अनुभव आहे. विज्ञान, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी या चार शाखा मिळून जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या एकूण १७ हजार ९२० जागा आहेत.

चार हजार विद्यार्थी आयटीआय व पाॅलीला जाणारगडचिराेली जिल्हा मुख्यालयी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. येथे पाच ते सहा शाखा आहेत. याशिवाय बाराही तालुकास्तरावर शासकीय आयटीआय आहे. आयटीआयला जवळपास ३,६०० आणि ४०० विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतमध्ये प्रवेश घेतात.९,२७८ विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेणार?दहावी उत्तीर्ण १३ हजार ३७४ विद्यार्थ्यांपैकी आयटीआय व पाॅलिटेक्निकचे प्रवेश वगळता उर्वरित ९ हजार २७८ विद्यार्थी यंदा जिल्हयात इयत्ता अकरावीला प्रवेश घेणार आहेत.

अशी हाेईल प्रवेश प्रक्रीया..माेठ्या शहरांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी स्पर्धा असते. त्यामुळे तेथे ऑनलाइन प्रक्रिया पार पाडली जाते. नागपूरात केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया हाेईल. उर्वरित चार जिल्ह्यात शासन नियमाप्रमाणे इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. येत्या शैक्षणिक सत्रात एकही विद्यार्थी इयत्ता अकरावीच्या प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असे नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी सांगितले.गुणवत्ता नसलेल्या शाळांच्या वाढणार अडचणीनामांकित व गुणवत्तापूर्ण कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी हाेत असते. अशा काॅलेजमध्ये दहावीच्या गुणवत्ता यादीनुसार अकरावीचे प्रवेश हाेत असतात. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी संख्येपेक्षा अकरावी प्रवेशाच्या जागा अधिक असल्याने गुणवत्ता नसलेल्या तसेच नवीन, विनानुदानित शाळांची यंदा अडचण हाेणार आहे. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल