शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

यंदा महामंडळाची धान खरेदी १५ लाख क्विंटलवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 15:30 IST

दिवाळीनंतर हंगाम सुरू होणार : बोनसमुळे वाढला शेतकऱ्यांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : आदिवासी विकास महामंडळाच्या उपअभिकर्ता म्हणून आविका संस्थानी सन २०२३-२४ या खरीप हंगामात १३ लाख क्विंटल धानाची खरेदी केली होती. मागील वर्षातील धान पिकाला प्रतिकूल परिस्थिती असताना आदिवासी विकास महामंडळाने मोठ्या प्रमाणात हमीभावात धानाची खरेदी केली होती. या वर्षात धान पिकाला पोषक वातावरण, समाधानकारक पाऊस, रोगाचा प्रादुर्भाव कमी व सध्याची धान पिकाची स्थिती लक्षात घेता यंदा धानाची विक्रमी खरेदी होणार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दिवाळी सण आटोपला की, १५ दिवसांनी आदिवासी विकास महामंडळ आविका संस्थांच्या मार्फतीने हमीभावाने धानाची खरेदी केली जाते. शासनाच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून धान विकल्यास शेतकऱ्यांना मिळणारा बोनसही हेक्टरी बऱ्यापैकी मिळत असल्याने शेतकरी आपला उत्पादित धान हमीभाव खरेदी केंद्रावरच विकण्याला प्राधान्य देत आहेत. 

या वर्षात खरिपाच्या धानाची वेळीच उचल झाल्याने धान खरेदीसाठी पुरेशी जागादेखील उपलब्ध आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरिपात खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईचा आणि राईस मिलपर्यंतच्या वाहतुकीचा तिढा काही प्रमाणात सुटल्याने या खरीप हंगामातील धान खरेदीसाठी जागा उपलब्ध असल्याने धानाच्या मोठ्या खरेदीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्याच्या निवडणुका तोंडावर असल्याने बोनस बऱ्यापैकी जाहीर होणार असल्याची शक्यता असल्याने या वर्षात महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात धान खरेदी होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने आदिवासी विकास महामंडळ व आविका संस्थाने तयारी चालविली आहे. 

"प्रतिकूल हवामानामुळे मागच्या वर्षात आरमोरी तालुक्यातील नऊ संस्थांच्या वतीने एक लाख ४३ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली होती. या वर्षात खरेदीचा आकडा वाढणार असून, वरिष्ठ पातळीवर तयारी चालविली आहे." - एच. एन. सोनबावणे, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आरमोरी

"मागील तीन ते चार वर्षापासून आदिवासी विकास महामंडळातून उपअभिकर्ता असलेल्या आविका संस्थांना कमिशन कमी मिळत आहे. खरेदी केलेल्या मालाची लवकर उचल होत नसल्याने घटीचे प्रमाण वाढते. त्यामुळे आविका संस्थांचाही विचार करण्यात यावा."- दिलीप कुमरे, व्यवस्थापक, आविका संस्था देलनवाडी.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली