शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:34 IST

येथील इंदिरा गांधी चौकातील मुख्य मार्गालगत असलेल्या शांती इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल संच, रोकड रकमेसह १५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारच्या मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देआरमोरीतील घटना : मोबाईल संच व रोकडसह १.१५ लाखाचा ऐवज लंपास

ऑनलाईन लोकमत आरमोेरी : येथील इंदिरा गांधी चौकातील मुख्य मार्गालगत असलेल्या शांती इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल संच, रोकड रकमेसह १५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारच्या मध्यरात्री घडली.रवी बारसागडे यांच्या मालकीचे मुख्य मार्गालगत इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून ते दुकानाच्या वर असलेल्या आपल्या घरी झोपी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील मोबाईल अस्ताव्यस्त फेकून ड्रॉफमध्ये ठेवलेले ९० हजार रूपये, तीन मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स सामान मिळून एकूण १ लाख १५ हजार ८०० रूपयांचा ऐवज लंपास केला. बुधवारी सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी बारसागडे हे खाली उतरले असता, त्यांना दुकानाचे शटरचे कुलूप तुटल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती आरमोरी पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गडचिरोली येथून स्वान पथक व अंगुलीमुद्र तज्ज्ञांना बोलाविण्यात आले. मात्र चोरट्याचा थांगपत्ता लागला नाही.अज्ञात चोरट्यांविरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वरघंटे करीत आहेत. सदर चोरीच्या घटनेमुळे व्यावसायिक व शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरमोरी पोलिसांची रात्र गस्त असतानाही चोरीची घटना घडल्याने आरमोरी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.