शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ खऱ्या अर्थाने ठरले जलदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:37 IST

कोणताही सजीव तहानेने अतिव व्याकूळ होऊन अगदी केविलवाणा होऊ लागला की, पाणी हेच त्या जीवाला परमेश्वर आणि अमृतासमान वाटते. अन्यथा पाण्याला त्याच्या महतीनुसार शोभेल असा मान अजून तरी मानव देतांना दिसत नाही. म्हणूनच आज माणूस पाण्यासाठी दाहीदिशा भटकतांना आणि टाहो फोडताना दिसून येतो.

ठळक मुद्देआमगावचे सुपुत्र : सहा दशकांपूर्वी व्याकुळलेल्यांची भागविली होती तृष्णा

अतुल बुराडे/विष्णू दुनेदार।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : कोणताही सजीव तहानेने अतिव व्याकूळ होऊन अगदी केविलवाणा होऊ लागला की, पाणी हेच त्या जीवाला परमेश्वर आणि अमृतासमान वाटते. अन्यथा पाण्याला त्याच्या महतीनुसार शोभेल असा मान अजून तरी मानव देतांना दिसत नाही. म्हणूनच आज माणूस पाण्यासाठी दाहीदिशा भटकतांना आणि टाहो फोडताना दिसून येतो. परंतु या विज्ञान युगाला लाजवेल असे व्यक्तिमत्व देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे होऊन गेले. ते म्हणजे मनिराम ढोरे महाराज!आज ‘पाणी वाचवा, पाण्याचा जपून वापर करा’ असे अनेक संदेश देत पाणी बचतीचे लाख प्रयत्न होत आहेत. तरीही अवस्था बिकटच आहे. त्यात सहा-सात दशकांपूर्वी आमगावच्या मनिराम ढोरे महाराजांनी पाण्याचे महत्त्व ओळखून आपल्या दोन्ही खांद्यावर कावड घेऊन सावंगी तसेच भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर परिसरात लोकांची तृष्णा भागविण्याचे काम केले. यातून त्यांनी पाण्याची खरीखुरी आवश्यकता आणि महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविले. २२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करताना मनिराम ढोरे महाराजांच्या कार्याचे स्मरण होते. पाण्यासाठी वाहिलेल्या त्यांच्या जीवन कार्यातून सकारात्मक प्रेरणा घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे.आमगाव येथे जन्मलेल्या मनिराम महाराजांची कर्मभूमी आमगाव, सावंगी आणि लाखांदूर परिसर राहिला. काम काय तर स्वत:च्या खांद्यावर कावड घ्यायची नि विहीर वा जलसाठ्यातील पाणी तहानलेल्यांना पाजायचे. मंगळवार हा दिवस मनिराम महाराजांसाठी जणू सणाचा दिवस असायचा. कारण या दिवशी लाखांदूरला आठवडी बाजार भरायचा आणि यानिमित्त आलेल्या हजारो लोकांना ते कावडीने वाहिलेल्या पाण्याने तृप्त करायचे. यामुळे त्यांना पंचक्रोशीत पाणीवाले मनिराम ढोरे महाराज म्हणून ओळख प्राप्त झाली होती, जी आजही कायम आहे. कार्य व कीर्तीने मनिराम महाराज खऱ्या अर्थाने जलदूत ठरले आहेत.सामाजिक कार्यांमध्येही महाराज अग्रणीमनिराम ढोरे महाराज केवळ वाटसरूंना पाणी पाजण्याचेच काम करीत नव्हते, तर फावल्या वेळेत गावांतील जनावरांना गवत-चारा टाकायचे. अनेक सामाजिक कार्यात सहभाग घ्यायचे. त्यांच्या या कार्याला सलाम म्हणून सावंगीवासीयांनी मनिराम महाराजांच्या मृत्यूनंतर गावात देसाईगंज-लाखांदूर मुख्यमार्गाच्या बाजूला समाधी बांधली. पाणी आणि मनिराम महाराजांचे नाव घट्ट विणले गेले आहे. हे येथील समाधीला भेटी देणाºया लोकांच्या भावनिकतेतून प्रदर्शित होते.

टॅग्स :Waterपाणी