शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

गडचिरोलीत होणार ५७५ जागांची पोलीस भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

राज्य शासनाने ऑगस्ट महिन्यात काढलेल्या जीआरनुसार जिल्ह्यात मराठा आरक्षण लागू करत आरक्षित जागांची फेररचना केली होती. परंतू लगेच त्याला स्थगिती दिली. तेव्हापासून पदभरतीची प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. आता त्यावर तोडगा काढून पोलीस भरतीचा मार्ग काढण्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे लवकरच पदभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

ठळक मुद्देराखीव जागांचा तिढा सुटणार : पोलीस अधीक्षकांचा शासनाकडे पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राखीव जागांच्या तिढ्यामुळे रखडलेली जिल्हा पोलीस दलाची पदभरती लवकरच घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हा पोलीस दलाच्या जवळपास ३२५ जागा आणि देसाईगंज येथे कार्यरत राज्य राखीव पोलीस दलाच्या बटालियनसाठी २५० जागांची मिळून ५७५ जागांची भरती जिल्ह्यात होणार आहे.राज्य शासनाने ऑगस्ट महिन्यात काढलेल्या जीआरनुसार जिल्ह्यात मराठा आरक्षण लागू करत आरक्षित जागांची फेररचना केली होती. परंतू लगेच त्याला स्थगिती दिली. तेव्हापासून पदभरतीची प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. आता त्यावर तोडगा काढून पोलीस भरतीचा मार्ग काढण्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे लवकरच पदभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. बेरोजगार युवकांमधील कौशल्य विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या मदतीने भरतीपूर्व प्रशिक्षणही सुरू केले जाणार आहे.गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलपीडित कुटुंबातील सदस्यांसाठी जिल्ह्यातील पदभरतीसाठी काही जागा राखीव आहेत. परंतू पीडितांची संख्या जास्त आणि निघणाऱ्या जागा मोजक्या असल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. त्यासाठी सदर नक्षलीपिडीतांसाठी इतरही जिल्ह्यातील भरतीत जागा राखीव असाव्या असा प्रस्ताव आपण राज्य शासनाला दिला आहे. त्याला मंजुरी मिळण्याची आशा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केली.शेतकऱ्यांचा खर्च होणार कमीशेतीच्या कामासाठी लागणारे ट्रॅक्टर, रोटावेटर, पेरणी यंत्र, थे्रशर यांच्या भाड्यामुळे शेतकºयांचा उत्पादन खर्च वाढत आहे. हा खर्च कमी करण्यासाठीही पोलीस विभागाने पुढाकार घेत हे साहित्य स्वत: खरेदी करून ते कोणतेही भाडे न घेता केवळ डिझेल, विद्युत खर्चाचा भार उचलणाºया शेतकऱ्यांना वापरण्यासाठी देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या स्तरावर गट शेतीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना डिझेल पंपाचे वाटप सुरू झाले आहे.रोजगार मेळावा घेणारपोलीस विभागाने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी ५ ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची केंद्रे उघडली आहेत. त्यात यावर्षी ५८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. विशेष म्हणजे त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण, परीक्षा शुल्क जिल्हा विकास निधीतून भरण्याची सोय करण्यात आली आहे.बेरोजगारांचा नोकरीसंदर्भातील कल जाणून घेण्यासाठी पोलीस विभागाने रोजगार मेळावा अ‍ॅप विकसित केले. त्यात ३४६० तरुण-तरुणींनी नोंदणी करत आपल्याला कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल याची माहिती टाकली. त्यांना शिक्षणानुसार योग्य त्या क्षेत्रात नोकरी देण्यासाठी लवकरच रोजगार मेळावा घेणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस