शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शहरात खुले जीम होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:41 IST

आरोग्याच्या दृष्टिकोनातून शहरातील युवक, युवती, विद्यार्थी तसेच नागरिकांना व्यायाम तसेच शारीरिक कसरत करण्याची सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने गडचिरोली पालिका प्रशासनाच्या वतीने शहरात खुली व्यायामशाळा (जीम) निर्माण करण्यात येणार आहे. यासंदर्भातील पालिका प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे.

ठळक मुद्देपालिकेचा पुढाकार : न.प.च्या सर्वसाधारण सभेत ठराव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आरोग्याच्या दृष्टिकोनातून शहरातील युवक, युवती, विद्यार्थी तसेच नागरिकांना व्यायाम तसेच शारीरिक कसरत करण्याची सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने गडचिरोली पालिका प्रशासनाच्या वतीने शहरात खुली व्यायामशाळा (जीम) निर्माण करण्यात येणार आहे. यासंदर्भातील पालिका प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे.नगर पालिकेची सर्वसाधारण सभा २४ सप्टेंबर रोजी सोमवारला पार पडली. या सभेत पालिकेतर्फे निर्माण करावयाच्या व्यायाम शाळेचा ठराव पारित करण्यात आला. पालिकेच्या वतीने शासनाच्या निधीतून व्यायामशाळा तयार व्हावी, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. या सभेला प्रामुख्याने नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्यासह सर्व सभापती व नगरसेवक उपस्थित होते.पालिका प्रशासनाच्या वतीने पालिकेच्या परिसरात व्यायामशाळा निर्माण करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार केला जात असून येत्या काही दिवसात हा प्रस्ताव अंतिम होणार आहे. त्यानंतर पालिकेच्या ठरावासह व्यायामशाळेचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच मागील महिन्यात पालिकेचे पदाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकाºयांशी चर्चा केली होती. व्यायामशाळेच्या मुद्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पालिकेचा ठराव व प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर व्यायामशाळा मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन क्रीडाधिकाºयांनी चर्चेत दिले होते.क्रीडा विभागाच्या योजनेतून पालिकेच्या परिसरात व्यायामशाळा उभारण्यात येणार आहे. जवळपास तीन ते साडेतीन लाख रूपयांचे सदर व्यायामशाळेचे बजेट राहणार आहे. पालिकेची व्यायामशाळा शहरातील युवक, युवती व नागरिकांना खुली राहणार असून सुविधेचा मोफत लाभ मिळणार आहे. पालिकेच्या वतीने शहरात प्रशस्त अशी व्यायामशाळा निर्माण करण्यासाठी नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे तसेच मुख्याधिकारी संजीव ओहोड यांनी पुढाकार घेतला आहे. दीपावलीनंतर व्यायामशाळेचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.खासगी जीम चालकांचा व्यवसाय मंदावणारपालिकेच्या वतीने न.प.कार्यालयाच्या परिसरात व्यायामशाळा तयार करण्यात येणार असून येथे युवक, युवती तसेच नागरिकांसाठी व्यायामाचे अनेक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर व्यायामशाळेच्या लाभासाठी शुल्क आकारण्यात येणार नसल्याने या जीमकडे विद्यार्थी व युवकांचा ओढा वाढणार आहे. परिणामी खासगी जीममधील युवकांची गर्दी कमी होणार आहे. परिणामी त्यांचा व्यवसाय मंदावण्याची शक्यता आहे.