शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

मेडिकल कॉलेज होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:01 IST

मेडिकल कॉलेजसाठी लागणाऱ्या सोयीसुविधा गडचिरोलीत किती प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने नियुक्त केलेल्या समितीने नियुक्त केलेल्या समितीने आपला सकारात्मक अभिप्राय दिला आहे.

ठळक मुद्देसमितीचे सकारात्मक संकेत । वैद्यकीय आणि भौतिक सुविधांबाबत समाधानी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्यात रुग्णांना तातडीने आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून इलाज मिळण्यासोबतच येथे वैद्यकीय अभ्यासक्रमाची सोय उपलब्ध करणारे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) सुरू होण्याची चिन्हं दिसून लागली आहेत. मेडिकल कॉलेजसाठी लागणाऱ्या सोयीसुविधा गडचिरोलीत किती प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने नियुक्त केलेल्या समितीने नियुक्त केलेल्या समितीने आपला सकारात्मक अभिप्राय दिला आहे.समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.राजेंद्र सुरपाम यांच्यासह प्रा.डॉ.शैलेश धवने व मुख्य प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड यांनी दोन दिवस गडचिरोलीत यासंदर्भात पाहणी करून माहिती जाणून घेतली. रुग्णालय व निवासासाठी पुरेशी इमारत, मंजूर खाटांची संख्या, उपलब्ध तांत्रिक बाबी यासह भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकनाप्रमाणे आवश्यक पुरेसी जागा उपलब्ध होऊ शकते का, आदी बाबी तपासण्यात आल्या.मेडिकल कॉलेजसाठी ३०० खाटांचे रुग्णालय आवश्यक असताना जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालय मिळून ४०० खाटा उपलब्ध आहेत. याशिवाय वाढीव १०० खाटा बाल रुग्णालयात मंजूर आहेत. २५ एकर जागेची गरज असताना ३७ एकर जागा उपलब्ध आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागील बाजुने असलेल्या झुडपी जंगलाची मोठी जागा उपलब्ध होऊ शकते. याशिवाय निवास व्यवस्थेसाठी नर्सिंग महाविद्यालयाचे वसतिगृह वापरता येऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करता गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे सहज शक्य होणार आहे.- तर याच वर्षी सुरू होणार?गडचिरोलीतील प्रस्तावित मेडिकल कॉलेजला अद्याप शासनाने मंजुरी दिलेली नाही. येत्या अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा झाल्यास आणि त्यासाठी लागणारा निधी शासनाने उपलब्ध करून दिल्यास मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे. मात्र तत्पूर्वी भारतीय आयुर्विज्ञान परिषद (एमसीआय)च्या चमूकडून सर्व सोयीसुविधांची तपासणी होईल. त्यांच्याकडून काढल्या जाणाऱ्या त्रुटी दूर कराव्या लागतील. त्यांचे पूर्ण समाधान झाल्यानंतरच मेडिकल कॉलेजच्या पहिल्या बॅचला प्रवेश देण्यासाठी मान्यता दिली जाणार आहे. सर्व स्तरावर तातडीने हालचाली झाल्यास २०२०-२१ च्या सत्रापासून हे मेडिकल कॉलेज सुरू होणे अशक्य नाही.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल