शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कालेश्वरम मंदिरातील साडीच्या चोरीचे रहस्य अद्याप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:06 IST

गडचिरोलीच्या सिरोंचा शहरापासून आठ कि.मी.अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर व मुक्तेश्वर मंदिरातील पार्वती देवीला मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी अर्पण केलेली महागडी साडी चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी केली होती अर्पण : सहायक धर्मदाय आयुक्तासह तिघे निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गडचिरोलीच्या सिरोंचा शहरापासून आठ कि.मी.अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर व मुक्तेश्वर मंदिरातील पार्वती देवीला मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी अर्पण केलेली महागडी साडी चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संपूर्ण यंत्रणा कामी लागली असताना या साडी चोरीचे रहस्य अजून उलगडले नाही. दरम्यान तेलंगणा सरकारने या मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे ई.ओ.हरीप्रकाश आणि बुर्री श्रीनिवास यांना गुरूवारी तर सहायक धर्मदायक आयुक्त उमा माहेश्वर राव यांना शुक्रवारी निलंबित केले.दोन वर्षांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांनी सपत्निक या मंदिरात दर्शन घेऊन मंदिरातील पार्वती देवीला सोन्याचा मुकूट व साडी अर्पण केली होती. महाराष्ट्र सीमेवरील मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाच्या कोनशीला अनावरणासाठी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव २ जून २०१६ रोजी कालेश्वरला आले होते. कार्यक्र मापूर्वी त्यांनी पत्नीसह या मंदिराला भेट देऊन कालेश्वर-मुक्तेश्वर स्वामींची पूजाअर्चा करून दर्शन घेतले. यावेळी सोन्याच्या मुकुटासह किमती साडी भेट दिली होती. मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या या साडीची चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. साडी चोरी झाल्याची बातमी बाहेर येताच भुपालपल्ली (करीमनगर) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आदींनी मंदिराला भेट देऊन प्रकरणाची माहिती जाणून घेतली.पुजाऱ्यांवर संशयविशेष म्हणजे ही साडी अर्पण केल्यानंतर काही दिवसातच चोरीला गेली. मात्र विश्वस्तांनी कोणतीही वाच्यता न करता तशीच दिसणारी दुसरी साडी आणून ठेवली. हा प्रकार गेल्या दोन वर्षात नेमका कधी घडला हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या दोन वर्षाच्या काळातील तत्कालीन दोन विश्वस्त एका सहायक धर्मदाय आयुक्तांना निलंबित करण्यात आले. मंदिराच्या पुजाºयांना नोटीस देण्यात आली.

टॅग्स :kaleshwar Templeकाळेश्वर मंदिरChief Ministerमुख्यमंत्री