स्थिती : चालू वर्षातील घरकुलाचा पत्ताच नाहीगडचिरोली : इंदिरा आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या १२ ही तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या ४ हजार ८६८ घरकुलांपैकी ४७८ घरकुलांच्या कामांना वर्ष उलटूनही सुरुवात झाली नाही. यामध्ये अहेरी तालुक्यातील १२२, आरमोरी तालुक्यातील ९, भामरागड तालुक्यातील ५१, चामोर्शी तालुक्यातील १०४, देसाईगंज तालुक्यातील ३, धानोरा तालुक्यातील १४, एटापल्ली तालुक्यातील ११, गडचिरोली ५२, कोरची ४, कुरखेडा ३३ व मुलचेरा तालुक्यातील ७५ घरकुलांचा समावेश आहे. प्रशासनाच्या वतीने वारंवार संबंधित लाभार्थ्यांना सूचना देऊनही काम हाती घेण्यात आले नाही.अहेरी तालुक्यात १ हजार ९३ घरकूल मंजूर करण्यात आले. यापैैकी एकाही घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले नसून ९७१ घरकूल अपूर्णावस्थेत आहेत. आरमोरी तालुक्यात २११ मंजूर घरकुलांपैकी ४७ घरकुलाचे पूर्ण झाले असून १५५ घरकूल अपूर्ण आहेत. भामरागड तालुक्यात १५१ घरकुलांपैकी १० घरकूल पूर्ण झाले असून ९० घरकूल अपूर्णावस्थेत आहेत. चामोर्शी तालुक्यात ७७८ मंजूर घरकुलांपैकी ९४ घरकूल पूर्ण झाले असून ५८० घरकूल अपूर्णावस्थेत आहेत. देसाईगंजमध्ये ७६ पैकी १८ घरकूल पूर्ण झाले असून ५५ घरकूल अपूर्णावस्थेत आहे. (प्रतिनिधी)अहेरी तालुका बॅकफुटवरअहेरी तालुक्याच्या अनेक गावांमध्ये सन २०१५-१६ यावर्षात इंदिरा आवास योजनेंतर्गत एकूण १ हजार ९३ घरकूल मंजूर करण्यात आले. या तालुक्यात एकाही घरकुलाचे काम ३० आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्यात आले नाही. तब्बल ९७१ घरकुलाचे काम अपूर्णस्थितीत आहेत. घरकूल बांधकामात अहेरी तालुका पिछाडीवर असल्याचे दिसून येते.
गतवर्षीच्या ४७८ घरकुलांचा प्रारंभच नाही
By admin | Updated: November 2, 2016 01:12 IST