शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

जिल्ह्यात बेडची कमतरता नाही, पण रेमडेसिविरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 05:00 IST

मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, काही रुग्णांना अतिशय सामान्य लक्षणे आहेत. अशा रुग्णांना सर्वप्रथम काेविड केअर सेंटरमध्ये भरती केले जाते. प्रत्येक तालुकास्तरावर हे सेंटर आहेत. त्या ठिकाणी बेडची व्यवस्था आहे. तसेच ज्यांच्या घरी स्वतंत्र शाैचालय व बाथरूम उपलब्ध आहे, अशा रुग्णांना घरीच थांबून उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

ठळक मुद्देगृहविलगीकरणामुळे काेविड केअर केंद्रांमधील अनेक बेड रिकामेच

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यात सध्या ३ हजार १३४ काेराेनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १ हजार ६२९ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत, तर १ हजार ५०५ रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत. जिल्हाभरातील रुग्णालये व काेविड केअर सेंटरमध्ये एकूण २ हजार २७ बेड उपलब्ध आहेत. साेमवारी जिल्हाभरातील ५२२ बेड रिकामे हाेते. मात्र रेमडेसिविर या इंजेक्शनचा पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा नसल्याचे दिसून येत आहे. मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, काही रुग्णांना अतिशय सामान्य लक्षणे आहेत. अशा रुग्णांना सर्वप्रथम काेविड केअर सेंटरमध्ये भरती केले जाते. प्रत्येक तालुकास्तरावर हे सेंटर आहेत. त्या ठिकाणी बेडची व्यवस्था आहे. तसेच ज्यांच्या घरी स्वतंत्र शाैचालय व बाथरूम उपलब्ध आहे, अशा रुग्णांना घरीच थांबून उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. जिल्हाभरातील १ हजार ६२९ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांपेक्षा बेडची संख्या अधिक असल्याने प्रत्येक रुग्णाला बेड उपलब्ध झाले आहे. मागील १५ दिवसांपासून राज्यभरात रेमडेसिविर लसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फटका गडचिराेली जिल्ह्यालाही बसला आहे. मागणीच्या तुलनेत लसही कमी प्रमाणात उपलब्ध आहे.

साैम्य लक्षणे असलेलेही रुग्णालयातकाेराेनामुळे मृत्यूची संख्या मागील आठ दिवसांमध्ये वाढली आहे. त्यामुळे काही रुग्ण अतिशय सामान्य लक्षणे असतानाही रुग्णालयात दाखल हाेऊन उपचार घेत आहेत. आकस्मिक स्थिती निर्माण झाल्यास अशा रुग्णांना घरीच राहून उपचार घेण्याचा सल्ला देता येणे शक्य आहे. मात्र, सध्या पुरेसे बेड उपलब्ध असल्याने घरीच उपचार करायचे की रुग्णालयात दाखल व्हायचे, या दाेन पर्यायांपैकी काेणता पर्याय निवडायचा हे रुग्णाला ठरवून दिले जाते. 

ऑक्सिजन सुविधा असणारे ३८४ बेड रिकामेकाेराेनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीची ऑक्सिजनची पातळी कमी हाेण्यास सुरुवात हाेते. त्यामुळे त्या रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन द्यावे लागते. ऑक्सिजन ही अतिशय महत्त्वाची बाब काेराेना रुग्णांसाठी आहे. जिल्हाभरातील रुग्णालयांमध्ये एकूण ५८० ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयात ३५०, कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात २०, आरमाेरीत २०, अहेरी येथे १००, एटापल्ली ५० व सिराेंचा येथे ४० ऑक्सिजनचे बेड उपलब्ध आहेत. सद्य:स्थितीत १९६ रुग्ण ऑक्सिजन बेडवर असून अजूनही ३८४ बेड रिकामे आहेत. या व्यतिरिक्त ऑक्सिजनचे सिलिंडर लावूनही उपचार घेता येतो. आकस्मिक स्थितीत ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी प्रत्येक काेविड केअर सेंटरवर ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्यात आले आहेत. यावरून जिल्ह्यात ऑक्सिजन बेड व ऑक्सिजनची कमतरता नसल्याचे दिसून येत आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या