शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात कोरोना रूग्णांसाठी स्वतंत्र वार्ड सुरू करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार विविध विभागांना कोरोना प्रतिबंधात्मक कामांचे वाटप करण्यात आले आहे. परदेशी व्यक्ती गडचिरोली जिल्ह्यात येत असेल तर त्याची माहिती पोलीस ठेवणार आहेत. सोशल मीडियावर व अन्य मार्गाने अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

ठळक मुद्देप्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू : जिल्हा प्रशासनाची माहिती; आपत्ती व्यपस्थापन कायदा २००५ लागू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाबाबत जिल्ह्यात सर्व प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू केला आहे. देशाबाहेरून आलेला व्यक्ती, कोरोनाबाधीत राज्य अथवा शहरातून आलेला व्यक्ती याबाबतची माहिती प्रशासनाला उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे.गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात कोरोना रूग्णांसाठी स्वतंत्र वार्ड सुरू करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार विविध विभागांना कोरोना प्रतिबंधात्मक कामांचे वाटप करण्यात आले आहे. परदेशी व्यक्ती गडचिरोली जिल्ह्यात येत असेल तर त्याची माहिती पोलीस ठेवणार आहेत. सोशल मीडियावर व अन्य मार्गाने अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. गर्दीच्या ठिकाणांवर प्रतिबंध घातला जाईल. घरोघरी जाऊन संशयीत व्यक्तींची तपासणी केली जाईल. आदी बाबींचा प्रतिबंधात्मक उपायांमध्ये समावेश आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाला औषध, मास्क, सॅनेटायझर यांचा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. औषधांविषयी नागरिकांना अचूक माहिती द्यावी. तसेच औषधांचा साठा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करून कोरोनाबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. खासगी डॉक्टरांना वैद्यकीय साधने, मनुष्यबळ, बेड आदींची कमतरता भासल्यास त्याही उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.अफवांवर विश्वास ठेवू नयेसोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. अफवा पसरविणाºयांवर कारवाई केली जाईल. सॅनेटायझर तसेच मास्कसाठी फारसे आग्रही न राहता साबनाने हात स्वच्छ धुवावे. सामान्य नागरिकांना मास्क वापरणे गरजेचे नाही. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेवर लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे.कोरोनाबाबत जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळणे हा एकमेव उपाय आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांना मंजुरी देऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.इतरही गावांनी निर्णय घेण्याची गरजजिल्ह्यात अनेक मोठ्या गावांमध्ये व तालुकास्थळी आठवडी बाजार भरतात. या ठिकाणी मोठी गर्दी उसळते. इतर गावांनीही बाजार बद ठेवण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे. गडचिरोलीत१५ मार्च रोजी रविवारी आठवडी बाजार भरला. या बाजारात गडचिरोली शहरातील नागरिकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे दिसून येत होते. काही नागरिक तोंडाला मास्क घालून बाजारात जात होते.सिरोंचाचा आठवडी बाजार बंदगर्दी टाळण्यासाठी सिरोंचा येथे दर सोमवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला असल्याचे नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी कळविले आहे. सिरोंचा येथील आठवडी बाजारात ग्रामीण भागातील हजारो नागरिक भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे बाजारात मोठी गर्दी उसळते. या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दर सोमवारी भरणारा आठवडी बाजार पुढील काही कालावधीसाठी रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आठवडी बाजार बंद करणारी सिरोंचा ही जिल्ह्यातील पहिली नगर पंचायत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना