शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

एकही अधिकृत रेतीघाट नाही, तरीही सर्रास काढली जाते रेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 05:00 IST

तालुक्यात मोठ्या संख्येने नदी-नाले असल्याने चांगली रेती उपलब्ध आहे. वनकायद्यावर तोडगा काढल्यास जारावंडी परिसरातून भापडा नदी, तसेच एटापल्लीजवळील आलदंडी नदी घाटांचा लिलाव होऊ शकतो. परंतु वनकायद्याच्या अडचणीमुळे पाच वर्षांपासून लिलाव प्रकिया झालीच नाही. २०१६ पूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी व वनअधिकारी यांच्या समन्वयातून लिलाव प्रकिया पार पडली होती.

रवी रामगुंडेवारलाेकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील २०१६ पासून वनविभागाच्या अडचणीमुळे एकाही रेतीघाटाचा लिलाव होऊ शकला नाही. तरीही तालुक्यातील शासकीय व खाजगी बांधकामाकरिता नदीतून सर्रासपणे अवैधरित्या रेतीचा उपसा केला जात आहे. तब्बल पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे शासनाचा कोट्यवधी  रुपयांचा  महसूल  बुडत  आहे.तालुक्यात मोठ्या संख्येने नदी-नाले असल्याने चांगली रेती उपलब्ध आहे. वनकायद्यावर तोडगा काढल्यास जारावंडी परिसरातून भापडा नदी, तसेच एटापल्लीजवळील आलदंडी नदी घाटांचा लिलाव होऊ शकतो. परंतु वनकायद्याच्या अडचणीमुळे पाच वर्षांपासून लिलाव प्रकिया झालीच नाही. २०१६ पूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी व वनअधिकारी यांच्या समन्वयातून लिलाव प्रकिया पार पडली होती. रेती घाटावरील अधिकृत रेती विक्री सुरु असताना  वनविभागाकडून हरकत घेतल्याने आलदंडी येथील रेतीघाटाचा लिलाव रद्द करण्यात आला. त्यानंतर रेतीघाट लिलावासाठी काढलेच नाही. 

लिलाव केल्यास शासन व नागरिकांचाही फायदा-    पाच वर्षांपासून तालुक्यात अधिकृत रेती घाटच नसल्याने बांधकामांसाठी अवैधपणे रेती तस्करी सुरु आहे. रेती चोरीमुळे आलदंडी नदीवर अनधिकृत रेतीघाट तयार झाले आहेत. नागरिकांपुढे पर्याय नसल्याने जादा दराने अवैध रेती घ्यावी लागत आहे. शासनाने अधिकृतपणे तालुक्यातील रेतीघाटांचे  लिलाव केल्यास नागरिकांना कमी दरात रेती मिळण्यासोबत शासनालाही महसूल मिळेल.-    सध्या चार ते पाच हजार रुपये प्रती ब्रास या दराने नागरिकांना रेती घ्यावी लागत आहे. अधिकृतरित्या रेतीचा लिलाव झाल्यास हे दर अर्ध्यावर येऊ शकतात.

 

टॅग्स :sandवाळू