शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

२०२ जागांसाठी नामांकनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 23:55 IST

निवडणूक विभागाने १६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा व २०७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र पोटनिवडणूक असलेल्या २०७ ग्रामपंचायतीमधील ३८४ प्रभागांपैकी केवळ १८२ नामांकन वैध ठरले आहेत.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : ३८४ प्रभागांसाठी केवळ १८२ उमेदवारांचे नामांकन वैध

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : निवडणूक विभागाने १६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा व २०७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र पोटनिवडणूक असलेल्या २०७ ग्रामपंचायतीमधील ३८४ प्रभागांपैकी केवळ १८२ नामांकन वैध ठरले आहेत. यातील काही प्रभागात एक पेक्षा अधिक नामांकन आले आहेत. तर काहींनी नामांकन मागे घेतले आहे. त्यामुळे २०२ पेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागा रिक्त राहणार आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुरूवातीला ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत नामांकन भरायचे होते. मात्र या कालावधीत इंटरनेटची समस्या निर्माण झाल्याने अनेक उमेदवारांना नामांकन भरता आले नाही. परिणामी शासनाने दोन दिवस मुदत वाढवून १२ फेब्रुवारीपर्यंत केली. गडचिरोली जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यामध्ये एकूण ४९ प्रभाग आहेत. या जागांसाठी एकूण १६६ उमेदवारांनी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी नामांकन भरले होते. त्यापैकी तीन नामांकन अवैध ठरून १६३ नामांकन वैध ठरले. तर सरपंच पदासाठी ३५ नामांकनापैकी ३३ नामांकन वैध ठरले आहेत.२०७ ग्रामपंचायतींमधील ३८४ प्रभागांमध्ये पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी १९३ नामांकन प्राप्त झाले होते. त्यापैकी १८२ नामांकन वैध ठरले. एका जागेस एक नामांकन असे गृहित धरले तरी उपलब्ध जागांच्या तुलनेत सुमारे २०२ नामांकन कमी आहेत. याचा अर्थ कमीतकमी २०२ ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागा रिक्त राहणार आहेत. काही प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक उमेदवारांनी नामांकन भरले आहेत. तर काहींनी मागे घेतले आहेत. त्यामुळे २०२ पेक्षा अधिक जागा रिक्त राहणार आहेत. या ठिकाणी पुन्हा सहा महिन्यांनी निवडणूक घ्यावी लागणार आहे.दुर्गम भागातील नागरिकांची निवडणुकीकडे पाठपोटनिवडणूक जाहीर झालेल्या बहुतांश ग्रामपंचायती धानोरा, अहेरी, भामरागड, सिरोंचा या तालुक्यातील आहेत. नक्षल्यांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याने नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना ग्रामपंचायत सदस्य न बनण्याची धमकी देतात. त्यामुळे बहुतांश नागरिक इच्छा असूनही ग्रामपंचायतीचे नामांकन भरत नाही. काही गावांमध्ये ज्या प्रवर्गासाठी जागा आहे. त्या प्रवर्गाचे नागरिकच नाही. त्यामुळे सदर गावात त्या प्रवर्गाचा उमेदवार मिळत नाही. या सर्व कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या जागा रिक्त राहतात. प्रशासनाला या ग्रामपंचायतीमध्ये वेळोवेळी निवडणूक घेण्याची नामुश्की ओढवते. यावेळी सुध्दा २०० पेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागा रिक्त राहणार असल्याने पुन्हा सहा महिन्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे.सरपंचपदासाठी चांगला प्रतिसाद१६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १६ सरपंचाच्या जागा आहेत. यासाठी एकूण ३३ नामांकन सादर झाले आहेत. कोरची तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी १२ नामांकन, धानोरा तालुक्यातील चार ग्रामपंचायतीमध्ये सात नामांकन, गडचिरोली तालुक्यातील एक सरपंच पदासाठी दोन नामांकन, एटापल्ली तालुक्यातील एका पदासाठी पाच नामांकन, भामरागड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी एकच नामांकन, अहेरी व कोरची तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी तीन नामांकन प्राप्त झाले आहेत.जात वैधता प्रमाणपत्राची अडचणग्रामपंचायतीची निवडणूक लढण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्राचा अर्ज तालुकास्तरावरून करावा लागतो, यासाठी अनेक दाखले जोडावे लागतात. तालुकास्थळाचे गावापासून अंतर ८० ते १०० किमी आहे. एवढ्या दूर अंतरावर जाऊन दाखले गोळा करणे शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश नागरिक जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र काढत नाही. जात वैधता प्रमाणपत्रच राहत नसल्याने बहुतांश नागरिक इच्छा असूनही ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अर्ज करू शकत नाही.