शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

...तर लोह प्रकल्पात 20 हजार कोटी गुंतवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 05:00 IST

सूरजागड पहाडावर झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध नागरिकांना रोजगार प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच एटापल्ली आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहांचे लोकार्पण तथा एटापल्ली तालुक्यातील वनहक्क पट्ट्यांचे वितरण नागरिकांना करण्यात आले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : सूरजागड लोहखाणीवर आधारित कोनसरी येथील लोह प्रकल्पाचे विस्तारीकरण करून हा प्रकल्प २० हजार कोटींवर नेण्याची आपली इच्छा आहे. त्यासाठी पुरेशी जागा आणि मालवाहतुकीसाठी लोहमार्ग उपलब्ध करून द्या, अशी अपेक्षा त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण यांनी बुधवारी (दि.१३) सुरजागड येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. त्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा उपलब्ध करून देण्यासोबतच रेल्वेमार्गासाठीही पुढाकार घेण्याची ग्वाही दिली. सूरजागड पहाडावर झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध नागरिकांना रोजगार प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच एटापल्ली आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहांचे लोकार्पण तथा एटापल्ली तालुक्यातील वनहक्क पट्ट्यांचे वितरण नागरिकांना करण्यात आले. यावेळी बोलताना आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी गोंडी भाषेतून भाषण दिले. एटापल्लीत पुरेशी जागा नसल्यामुळे लोह प्रकल्प कोनसरी येथे होत असला तरी एटापल्ली तालुक्यात जास्तीत जास्त विकासाची कामे करा, रेल्वेमार्ग आणा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. सुरुवातीला जिल्हाधिकारी संजय मीना यांनी सुरजागड लोह प्रकल्पामुळे सध्या १७८१ लोकांना थेट रोजगार सुरू झाल्याचे सांगून कोनसरीतील प्रकल्पानंतर रोजगार निर्मिती वाढेल, असे सांगितले. कार्यक्रमाला बहुतांश गावांचे नागरिक हजर हाेते.

नक्षली हिंसेत बळी गेलेल्यांचे स्मरण ठेवा-    यावेळी डीआयजी संदीप पाटील यांनीही जोषपूर्ण भाषणात नक्षल्यांच्या हिंसेने बळी गेलेल्या या जिल्ह्यातील नागरिकांचे स्मरण ठेवा. त्यांच्या दहशतीला भीक घालू नका, असे आवाहन नागरिकांना केले. सुरजागड प्रकल्प आर्थिक प्रगतीची गंगा या भागात आणणारा असून त्याचे श्रेय राज्य शासन व पालकमंत्र्यांना असल्याचे सांगितले.

जानेवारीपर्यंत लोहनिर्मितीला सुरुवात-    यावेळी बोलताना त्रिवेणी कंपनीचे एमडी बी.प्रभाकरण अवघ्या ६ महिन्यांत कंपनीने बरीच कामे करून दाखविली असून जानेवारी २०२३ मध्ये कोनसरीतील प्रकल्पात लोहनिर्मितीला प्रत्यक्षात सुरुवात होईल, असा विश्वास व्यक्त केला. कंपनीकडून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जात आहे. आलापल्ली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी जागा देण्याची मागणीही त्यांनी केली.

कौशल्य विकास प्रकल्पयावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाटा कन्सलटन्सीकडून १७५ कोटी आणि राज्य शासनाच्या ३० कोटी गुंतवणुकीतून गडचिरोलीत कौशल्य विकास प्रकल्प सुरू करणार असून त्यातून दरवर्षी ५ हजार युवक-युवती प्रशिक्षित होतील, अशी माहिती यावेळी बोलताना दिली. या प्रकल्पामुळे बेराेजगारांना जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याबाहेरही राेजगाराची संधी मिळणार आहे. 

प्रथमच सूरजागडचे दर्शनजंगलाच्या कुशीतील सुरजागड पहाड आणि लाेहखाण या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांनी पहिल्यांदाच पाहिले. पालकमंत्री येणार असल्याने शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी हजर हाेते. त्यात प्रामुख्याने गडचिराेलीचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, अहेरीचे जिल्हाप्रमुख रियाज शेख, जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार, विलास काेडाप, रामकिरीत यादव, अश्विनी यादव हजर हाेते.  

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेguardian ministerपालक मंत्री