शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बोहल्यावर चढण्यापूर्वीच युवक गेला आयसीयूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

सर्व आनंदी आनंद असताना राहुलवर अपघाताचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. १ फेब्रुवारी राेजी  सायंकाळच्या सुमारास गावाकडे परत जाताना पेपर मिलच्या पुढे जकात नाक्याजवळ रस्त्याच्या बाजूला एक सायकल उभी हाेती. सायकलला दुचाकीची धडक बसली. यात राहुलच्या डाेक्याला मार लागल्याने त्याला ब्रम्हपुरी मधील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले. आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, ताे अजूनही बेशुद्धावस्थेत आहे.

पुरुषोत्तम भागडकरलाेकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी’ या गाण्याप्रमाणे एक घटना देसाईगंज तालुक्यातील कुरूड गावातील युवकाबाबत घडली. त्याचे ६ फेब्रुवारी राेजी लग्न हाेणार हाेते. मात्र, १ फेेब्रुवारी राेजी त्याचा अपघात झाला. ताे बेशुद्ध असून, आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरू आहे.देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील राहुल देवा दिघोरे (वय २८) असे युवकाचे नाव आहे. राहुल हा देसाईगंज येथील एका खासगी हाॅस्पिटलमध्ये  मागील १४ वर्षांपासून रुग्णसेवेत कार्यरत होता. नुकतेच त्याचे लग्न चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील एका मुलीशी जुळले, साखरपुडापण आटोपला. सर्व आनंदी आनंद असताना राहुलवर अपघाताचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. १ फेब्रुवारी राेजी  सायंकाळच्या सुमारास गावाकडे परत जाताना पेपर मिलच्या पुढे जकात नाक्याजवळ रस्त्याच्या बाजूला एक सायकल उभी हाेती. सायकलला दुचाकीची धडक बसली. यात राहुलच्या डाेक्याला मार लागल्याने त्याला ब्रम्हपुरी मधील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले. आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, ताे अजूनही बेशुद्धावस्थेत आहे. विशेष म्हणजे त्याच्या दुचाकीवर असलेला बालक व दुसऱ्या एका व्यक्तीला खरचटले सुद्धा नाही. दिनांक ६ ला तो लग्नाच्या बेडीत अडकून आपल्या भावी जीवनाची प्रत्यक्ष सुरुवात करणार होता. पण कदाचित नियतीला हे मान्य नसावे. त्याच्याबाबत भातकुलीच्या खेळाप्रमाणे घडलेले  असून, त्याच्या संसाराचा खेळ  अर्ध्यावरच मोडला, असे म्हणावयास हरकत नाही. 

गावकरी गाेळा करीत आहेत मदतराहुलची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.  शस्त्रक्रियेसाठी लाखाे रुपये खर्च येणार आहे. गावातील नागरिक पैसे गाेळा करीत आहेत. त्याची प्रकृती चांगली व्हावी यासाठी प्रार्थना करीत आहेत.

 

टॅग्स :Accidentअपघात