शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या युवकाला आईसमोरच वैनगंगेत मिळाली जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 22:11 IST

Gadchiroli News घरातल्या पुजेतील फुले (निर्माल्य) विसर्जन करण्यासाठी वैनगंगा नदीवर गेलेला येथील अभियंता युवक आईसमोरच नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देआंघोळीसाठी गेलेल्या अभिनवचा मृतदेहच हाती लागला

गडचिरोली : घरातल्या पुजेतील फुले (निर्माल्य) विसर्जन करण्यासाठी वैनगंगा नदीवर गेलेला येथील अभियंता युवक आईसमोरच नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. दरम्यान, दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अखेर सोमवारी त्याचा मृतदेहच डोर्ली घाटात आढळला. अभिनव दौलत कुथे (२३) असे मृत युवकाचे नाव असून, तो येथील नवीन बस स्थानकासमोरील भागातील रहिवासी होता.

प्राप्त माहितीनुसार, अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या अभिनवला काही महिन्याआधीच पुण्यात नोकरी लागली होती. सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असल्याने आरमोरीत होता. रविवारी आईसोबत निर्माल्य विसर्जन करण्यासाठी वैनगंगा नदीपात्रात उतरला होता. त्यानंतर त्याने आईला सांगून आंघोळ करण्याची इच्छा व्यक्त केली. थोड्या वेळात तो आंघोळ करून परतला; पण पुन्हा आंघोळीसाठी नदीपात्राकडे गेला. यावेळी तो नदीपात्रात थोडा पलिकडे गेला. नदीप्रवाहाचा वेग जास्त असल्याने तो तोल जाऊन पात्रात पडला आणि प्रवाहात वाहून गेला. पोलिसांनी बचाव पथकाच्या मदतीने रविवारी सायंकाळपर्यंत त्याचा शोध घेतला; पण त्याचा थांगपत्ता लागला नाही. सोमवारी पुन्हा आरमोरीसह ब्रम्हपुरी पोलिसांनी मिळून शोधमोहीम राबविली असता, डोर्ली घाटात अभिनवचा मृतदेह सापडला.

धरणाचे पाणी सोडल्याने वाढला प्रवाह

मागील तीन दिवसांपूर्वी गोसे खुर्द धरणामधून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला. वाहत्या पाण्याला आणखी धार आली. त्यात अभिनवला पोहता येत नव्हते. त्यामुळे आईने त्याला खोल पाण्याकडे जाण्यास रोखण्याचा प्रयत्न केला; पण काळाने अभिनवला तिकडे खेचून नेले. अभिनव काही वेळातच दिसेनासा झाल्याने त्याची आई घाबरली. तिने मदतीसाठी आरडाओरड केली; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आरमोरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी बचाव पथकामार्फत संध्याकाळपर्यंत शोध घेतला.

शिक्षक दाम्पत्यावर आघात

अभिनव हा आरमोरी येथील महात्मा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक दौलत कुथे आणि जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षिका अनिता कुथे यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला एक मोठी बहीण असून, ती डॉक्टर आहे. तरुण मुलाच्या अशा अकाली जाण्याने शिक्षक दाम्पत्यावर मोठा आघात झाला असून, त्यांची सर्व स्वप्नं भंग झाली आहेत. आरमोरीकरांमध्येही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यू