शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेली शहरात जाेमात सुरू आहेत दाेन काेटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 05:00 IST

गडचिराेली नगरपालिका प्रशासनाला नगराेत्थान, वैशिष्ट्यपूर्ण ठक्करबापा दलितवस्ती विकास, रस्ते अनुदान आदी याेजनांतून दरवर्षी लाखाे रुपयांचा निधी उपलब्ध हाेत असताे. सन २०२१-२२ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२२ राेजी संपणार आहे. शहरात सुरू असलेल्या कामांची मुदतही ३१ मार्च २०२२ अशी आहे. विविध याेजनांतर्गत संरक्षक भिंत, रस्ते, नाली, तसेच इतर इमारतींची कामे चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने   कंत्राटदारांना  दिले  आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शहरात नगरपालिका प्रशासनाच्या वतीने खासगी कंत्राटदारांमार्फत शासनाच्या विविध याेजनांतून लहान-माेठी अशी दाेन काेटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. नगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आल्यापासून कामाची गती वाढल्याचे दिसून येत आहे. ३१ मार्च २०२२ पूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनासह कंत्राटदारांची धडपड सुरू आहे. गडचिराेली नगरपालिका प्रशासनाला नगराेत्थान, वैशिष्ट्यपूर्ण ठक्करबापा दलितवस्ती विकास, रस्ते अनुदान आदी याेजनांतून दरवर्षी लाखाे रुपयांचा निधी उपलब्ध हाेत असताे. सन २०२१-२२ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२२ राेजी संपणार आहे. शहरात सुरू असलेल्या कामांची मुदतही ३१ मार्च २०२२ अशी आहे. विविध याेजनांतर्गत संरक्षक भिंत, रस्ते, नाली, तसेच इतर इमारतींची कामे चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने   कंत्राटदारांना  दिले  आहेत.जिल्हा मुख्यालय स्तरावर असलेल्या गडचिराेली नगरपालिकेला शासनाकडून गेल्या दाेन वर्षांत काेट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला. तब्बल ९८ काेटी रुपयांच्या भूमीगत गटार याेजनेचे काम गडचिराेली शहरात सुरू आहे. या याेजनेचे बरेचशे काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामांना गती देण्यात आली आहे. नगरपालिकेचे प्रशासक सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर व मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनात शहरात गेल्या महिनाभरापासून विकासकामांनी गती घेतली आहे.

 कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे यंत्रणा झाली अलर्ट -  गडचिराेली नगरपालिकेच्या स्थानिक बाॅडीची मुदत संपली आहे. आता पालिकेचा कारभार पदाधिकारी व नगरसेवकांच्या हातात नाही. आयएएस दर्जाच्या प्रशासकांच्या हाती पालिकेचा कारभार आल्यापासून नगरपालिकेची यंत्रणा गतिमान झाली आहे. कर वसुलीपासून सर्वच कामे खबरदारीने व जलद गतीने हाेत आहेत.

ही आहेत माेठी कामेनगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहराच्या विविध वाॅर्डांत रस्ते, नाली, छाेटे पूल आदींसह ओपन स्पेसचे काम सुरू आहे. याशिवाय चार ते पाच माेठी कामे सुरू असून, त्याची किंमत लाखाच्या घरात आहे. यामध्ये चंद्रपूर मार्गावरील नगर भवनाच्या आतमध्ये फायर ब्रिगेड स्टेशनचे काम सुरू  आहे. नगर परिषद कार्यालयासभाेवताल संरक्षक भिंत तसेच खरपुंडी मार्गावरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या सभाेवताल संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग