शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...तर अख्ख्या गावाला द्यावे लागते मांसाहरी जेवण; पुसेर गावात नियमावली

By संजय तिपाले | Updated: May 5, 2023 19:02 IST

जिल्हा निर्मितीनंतर अडीच दशकांपासून दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांत व्यसनमुक्तीसाठी कडक नियम आहेत.

गडचिरोली: जिल्हा निर्मितीनंतर अडीच दशकांपासून दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांत व्यसनमुक्तीसाठी कडक नियम आहेत. चामोर्शी तालुक्यातील पुसेर हे गाव देखील अशाच नियमांमुळे चर्चेत आले आहे. या गावात दारुविक्री करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड व संपूर्ण गावाला मांसाहरी जेवणाचा दंड केला जातो. आता तर खर्रा पन्नी आढळली तरीही दंडापोटी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. चामोर्शी तालुक्यापासून ४० किमी अंतरावरील पावी मुरांडा या ग्रामपंचायत अंतर्गत पुसेर गावाचा समावेश आहे. जिल्ह्यात बंदी असली तरी ९ वर्षांपूर्वी गावात चोरीछुपे दारु विक्री होत असायची. त्यामुळे घराघरात वादविवाद, मारामाऱ्या होत. महिलांवर कौटुंबिक अत्याचारही वाढले होते. व्यसनात अखंड बुडालेल्या या गावाने दारुबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसभा घेतली व दारू, खर्रा, तंबाखू बंदीचा ठराव केला. दारु विक्री केल्याचे आढळल्यास पाच हजार रुपये दंड व गावाला मांसाहरी जेवण देण्याचा नियम घातला. 

अलीकडे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात खर्राकडे वळत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी अधिक कडक नियम केला आहे. कोणी खर्रा खाऊन पन्नी फेकल्याचे दिसल्यास शंभर रुपये दंड केला जाणार आहे.   मुक्तिपथचे तालुका उपसंघटक आनंद सिडाम,गावपाटील केसरी मट्टामी,उपसरपंच विनोद कोंदामी, ग्रा.पं. सदस्य मधुकर कोवासे यांनी व्यसनमुक्तीबाबत ५ मे रोजी मार्गदर्शन केले. ग्रामसभा अध्यक्ष नामदेव मट्टामी, ग्रामसभा सचिव सुधाकर तुमरेटी आदी उपस्थित होते.

गावातून काढली फेरीव्यसनमुक्त झालेल्या पुसेर गावाने यापूर्वीच विजयस्तंभ उभारला आहे. ५ मे रोजी गावातून जनजागृती फेरी काढून पुन्हा एकदा व्यसनमुक्तीची हाक दिली आहे. यावेळी पारंपरिक वाद्यवृंदासह निघालेल्या मिरवणुकीत महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली