शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नद्या, कालव्यांचे पाणी उशाशी तरीही पिकांच्या काेरड घशाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

ऊर्जामंत्र्यांनी कृषिपंपांना दिवसातून केवळ आठच तास वीजपुरवठा केला जाईल, असा आदेश काढला. या आदेशामुळे शेतकऱ्यांचे नियाेजन बिघडले. आठ तासच जर वीज असेल तर पूर्ण शेतीला उन्हाळ्यात पाणी देणे शक्य हाेणार नाही. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी पऱ्हे टाकल्याच्या तुलनेत केवळ अर्ध्याच जागेवर धानाची लागवड केली. मात्र आता राेवलेले धानही वाचविणे कठीण झाले आहे. सिंचन हाेत नसल्याने पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. 

अरविंद घुटकेलाेकमत न्यूज नेटवर्कमोहटोला (किन्हाळा) : देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात भाजीपाला व रब्बी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. ही सर्व पिके फक्त विद्युत पंपाच्या भरोशावरच घेतली जातात. परंतु शासनाने भारनियमन लागू केले आहे. परिणामी पुरसे पाणी देणे शक्य नसल्याने पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी तीव्र असंताेष निर्माण झाला आहे.भाजीपाला पिकांची नुकतीच लागवड झाली हाेती, तर काही शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले हाेते. दरम्यान, ऊर्जामंत्र्यांनी कृषिपंपांना दिवसातून केवळ आठच तास वीजपुरवठा केला जाईल, असा आदेश काढला. या आदेशामुळे शेतकऱ्यांचे नियाेजन बिघडले. आठ तासच जर वीज असेल तर पूर्ण शेतीला उन्हाळ्यात पाणी देणे शक्य हाेणार नाही. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी पऱ्हे टाकल्याच्या तुलनेत केवळ अर्ध्याच जागेवर धानाची लागवड केली. मात्र आता राेवलेले धानही वाचविणे कठीण झाले आहे. सिंचन हाेत नसल्याने पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. एक आठवडा दिवसा, तर दुसऱ्या आठवड्यात रात्री विद्युत देणे सुरू असल्याने रात्री-बेरात्री बांधावर जावून पाणी करणे अनेकांच्या जीवावर येत आहे. मजुरांची वाणवा असल्याने काही शेतकरी पत्नीसह रात्र जागून पिकांना पाणी देत आहेत. यात फार मोठा धोका होण्याची संभावना शेतकरी बोलून दाखवित आहेत. कारण या भागात जंगली श्वापदांचा वावर असल्याने जीवास धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे शासनाने लक्ष देऊन भारनियम बंद करण्याची मागणी हाेत आहे.

अनेकांची वीज कापली -    कृषिपंपाचे वीजबिल भरले नाही. या कारणास्तव अनेकांची वीज कापण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांवर २० ते ४० हजार रुपयांचे वीजबिल थकित आहे. पीक निघाले असते तर हे बिल भरणे शक्य झाले असते, मात्र आता वीजच नसल्याने पीक करपत चालले आहे. झालेला खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. पीक करपल्यास वीजबिल भरणार कसे? असा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प