शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या बसमधून धूर निघाल्याने विद्यार्थ्यांची उडाली घाबरगुंडी, चालकाच्या सतर्कतेने टळला अपघात

By गेापाल लाजुरकर | Updated: September 7, 2023 17:29 IST

Gadchiroli: मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी सिराेंचा ते आसरअल्ली या रस्त्यावर धावणाऱ्या बसचे फॅनबेल्ट राजीवनगर गावाजवळ बुधवारी सकाळी ११ वाजता अचानक तुटले. बस बंद पडली.

- गाेपाल लाजूरकर गडचिराेली : मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी सिराेंचा ते आसरअल्ली या रस्त्यावर धावणाऱ्या बसचे फॅनबेल्ट राजीवनगर गावाजवळ बुधवारी सकाळी ११ वाजता अचानक तुटले. बस बंद पडली. चालकाने प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळवल्याने सर्व विद्यार्थी व प्रवासी बाहेर पडले. खाली उतरून पाहिले असता बसच्या इंजिनमधून धूर निघत हाेता. इंजिन अधिक गरम झाले असते तर बस पेट घेण्याचा धाेकासुद्धा हाेता.

सिराेंचा तालुक्यात अहेरी आगारातून प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांसाठी बसफेऱ्या साेडल्या जातात. दररोज दोन बसफेऱ्या असल्याने तेथे विद्यार्थी व प्रवाशांची माेठ्या प्रमाणात गर्दी असते. बुधवारी आसरअल्ली मार्गे साेडलेली बस भंगार हाेती. ही बस अचानकपणे राजीवनगर गावाजवळ या बसचे फॅन बेल्ट तुटल्याने बस अचानक रस्त्यावर बंद पडून बसमधून धूर निघू लागल्याने बसमधील शालेय विद्यार्थ्यी वप्रवासी भीतीने बसमधून बाहेर पडण्याची घाई करीत हाेते. अनेकजण घाईघाईने जीव मुठीत घेऊन खाली उतरले काही वेळ प्रवासी व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र बसचे चालक व वाहकांनी सहकार्य केले.

सिराेंचा तालुक्यात भंगार बसेस वाहतुकीवरअंकिसा व आसरअल्ली परिसरातील शालेय विद्यार्थी सिराेंचा येथे शिक्षणासाठी येतात. ते दरराेज बसने प्रवास करतात. सिरोंचा तालुक्यातील रस्ते दुरवस्थेत आहेत. शिवाय महामंडळाच बसेससुद्धा भंगार आहेत. तरीही याच भागात भंगार बसेस साेडल्या जातात. यामुळे अपघाताची शक्यता असल्याने नवीन बसेस साेडाव्या, अशी मागणी पालक करीत आहेत.

टॅग्स :state transportएसटीGadchiroliगडचिरोली